अर्जुन भोईसर,लोहारा.
दिशा लाईव्ह न्यूज --::--- लोहारा, ता.पाचोरा येथील भूमीपुत्रास कोल्हापूर संस्थानात राजर्षी शाहू महाराजांच्या भवनात दिनांक ७सप्टेबर रोजी अर्जुनभोई यांना राष्ट्रीय गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. नक्कीच लोहारा गावाच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
सरांविषयी सांगायचे तर..खान्देश भूषण सन्मानाने ते जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात सन्मानित आहेत. सामाजिक, सांस्कृतिक, पर्यावरण, शैक्षणिक, क्रीडा, सहकारीता आदि ठिकाणी त्यांनी आपल्या कार्याची छाप सोडून आपल्या विभागात ते परिचित आहेत.
मुंबई विभागात तक्षशिला महाविद्यालयात ते गेल्या २७ वर्षापासून कार्यरत आहेत. राज्यात भटक्यांच्या हक्कासाठीचे कार्य करतांना विविध नेतृत्वा बरोबर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराला आपल्या प्रबोधन पर कृतीतून प्रत्यक्षात विविध पातळीवर समोर ठेवण्याचा प्रयत्न केला आहे आणि करत आहेत. महिला सक्षमीकरण, महिलांचे हक्क यावर स्वतःच्या कुटुंबातूनच प्रत्यक्ष सुरूवात करून स्वत:च्या कुटुंबातून त्यांनी महिलांचे अधिकार म्हणजे काय? हे कृतीयुक्त कार्य दाखवून दिले आहे. पीएमओ आँफीसनेही त्यांच्या कार्याची दखल घेतलेली आहे. आजपर्यंत राज्यातून तसेच भारतीयपातळीवर बारा बलुतेदार भूषण, भोई गौरव, खान्देश भूषण, समाज भूषण महाराष्ट्र, समाज साथी मध्यप्रदेश, समाज सन्मान.... अशा ३०ते ४० विविध पुरस्कारांनी ते सन्मानित आहेत. डॉ बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय व अल्पसंख्याक शिक्षक/शिक्षकेतर कर्मचारी संस्थासंघटन या नामांकित संघटनच्या माध्यमातून पुण्यातील डॉ बाबासाहेब आंबेडकर भवनात त्यांना अगोदरच राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
तालुका, जिल्हा, विभागीय स्तर, राज्यस्तर अशा विविध पातळीवर ते शैक्षणिक प्रशिक्षण कार्यक्रमात तज्ञ म्हणून सहभागी आहेत. कोल्हापूर संस्थानात राजर्षी शाहू महाराज यांच्या भवनात त्यांना सन्मानित होतांना पाहतांना कुटुंबियांना निश्चितच आनंद होईल असे एका कुटुंबसदस्यांकडून आमच्या प्रतिनिधीकडे मनोदय व्यक्त करण्यात आला.


Post a Comment
0 Comments