Type Here to Get Search Results !

शेतकरी धक्कादायक ब्रेकिंग:--- जळगाव मार्केट यार्ड मध्ये शेतकऱ्यांच्या मालाला अचानक पणे कमिशन कट्टी. भाजीपाला उत्पादक शेतकरी संतप्त !!



सुनील लोहार-कुऱ्हाड प्रतिनिधी.

 दिशा लाईव्ह न्यूज -:-  हि अवस्था आहे भारताच्या कृषिप्रधान देशाची.

काय चालल आहे या महाराष्ट्रात

ज्याला जगाचा पोशिंदा संबोधले जाते तोच आज व्यापाऱ्यांना पोसणे झाला आहे.

जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील कुऱ्हाड गावात अनेक भाजीपाला उत्पादक शेतकरी आहेत.

आणि शेतकऱ्याची वर्षभराची गुजराण या शेतमालावर असते,आणि हाच शेतीमाल (भाजीपाला ) जर कवडीमोल भावात विकल्या जातो,त्यात मार्केट कमेटी ने  शेतकऱ्यांच्या मालावर कोणताही कर लावला जात नाही असे ठासून सांगतात.

मग आज पासून सदर जळगाव भाजीपाला मार्केट मध्ये शेतकऱ्याच्या हिशोब पावतीवर उचल म्हणून पैशांची केलेली कपात कुठपर्यंत योग्य आहे. 

तरी या शेतकऱ्यांना जो पर्यंत न्याय मिळत नाही तो पर्यंत लढा सुरू राहील ,

आणि या संदर्भात या परिसरातील शेकडो भाजीपाला उत्पादक शेतकरी  जळगाव जिल्हाधिकाऱ्यांकडे लवकरच आपली कैफियत मांडणार असल्याचे या शेतकऱ्यांनी सांगितले.


Post a Comment

0 Comments