Type Here to Get Search Results !

पहूर येथे राष्ट्रीय महामार्गाचे काम रेंगाळले राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण सुस्त : नागरिक त्रस्त


पहूर प्रतिनिधी-(ता. जामनेर)

 दिशा लाईव्ह न्यूज -:-- जळगाव–छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय महामार्गावरील पहूर येथे वाघूर नदीवरील पुलाचे काम अद्यापही अपूर्ण आहे. पुलाच्या दोन्ही बाजूंच्या साईड पट्ट्या, सुरक्षा कठडे तसेच पादचारी पुलाचे काम अजूनही पूर्ण झालेले नाही.


राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या ढिलाईमुळे नागरिकांना दररोज जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. शनि महाराज मंदिरासमोरील त्रिफुली हे ठिकाण धोकादायक वळण बनले असून येथे वारंवार अपघात घडत आहेत. तरीदेखील स्थानिक प्रशासन याकडे गांभीर्याने पाहताना दिसत नाही.


"हे काम पूर्ण कधी होणार? राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अजून किती जिवांचा बळी जाण्याची वाट पाहत आहे?" असा संतप्त सवाल सूज्ञ नागरिक करत आहेत.

Post a Comment

0 Comments