Type Here to Get Search Results !

पुणे येथे लोहारा येथील सुपुत्र डॉ. अर्जुन भोई यांना सिने क्षेत्रातील सर्वोच्च मानल्या जाणाऱ्या दादासाहेब फाळके इंटरनॅशनल सिनेअवार्ड २०२५ने सन्मानित..



 दिशा लाईव्ह न्यूज   --::--- डॉ जे. जी. पंडित माध्यमिक विद्यालय, लोहारा आणि आचार्य गजाननराव गरूड माध्यमिक व ज्युनिअर काॅलेज, शेंदुर्णीचे माजी विद्यार्थी अर्जुनभोई यांना मागील रविवारी नवीदिल्ली येथे अमेरिकेतील युनिव्हर्सिटी, युनिव्हर्सिटी आँफ लुयिसीआनाच्या माध्यमातून डॉक्टरेट प्रदान करण्यात आली होती.


 काल पुन्हा त्यांना पुणे शहरातील पंडित जवाहरलाल नेहरू सभागृहात दादासाहेब फाळके इंटरनॅशनल सिनेअवार्ड २०२५ने सन्मानित करण्यात आले. दादासाहेब फाळके इंटरनॅशनल अवार्डने सन्मानित होऊन त्यांनी लोहारा गावात नवचैतन्य निर्माण केले आहे.



 पुण्यातील पंडित जवाहरलाल नेहरू सभागृहात मराठी हिंदी, कोंकणी सिनेसृष्टीतील अनेक मान्यवर उपस्थित होते. डॉ अर्जुनभोई यांनी आतापर्यंत अनेक नाटकामधून व काही टेलिफिल्ममधूनही कार्य केले आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित एका टेलिफिल्ममध्ये त्यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या गुरुजींची भूमिका साकारली आहे. सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातही त्यांचे कार्य राज्य तसेच राष्ट्रीयस्तरावर वाखाणण्यात आले आहे. 



आजपर्यंत त्यांना अनेक मान सन्मानाने सन्मानित करण्यात आले आहे. ते राज्य व राष्ट्रीयस्तरावर आदर्श गुणवंत शिक्षक पुरस्कारानेही सन्मानित आहेत. 

जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयातही त्यांना खान्देशभूषण सन्मानाने सन्मानित करण्यात आलेले आहे. पुण्यात डॉ अर्जुनभोई यांना दादासाहेब फाळके इंटरनॅशनल सिनेअवार्ड २०२५ने सन्मानित करण्यात आल्याने लोहारापरिसरातून त्यांचे खुप मोठ्या प्रमाणात कौतुक करण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments