पहूर प्रतिनिधी-- (ता. जामनेर):
दिशा लाईव्ह न्यूज। --::- जामनेर तालुक्यातील पहूर येथून जवळच असलेल्या जांभूळ येथील एका ३० वर्षीय तरुणाने वाकोद येथे भाड्याच्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सागर प्रकाश कदम (वय ३०) हा वाकोद येथे भाड्याच्या घरात वास्तव्यास होता. नैराश्याच्या झटक्यात त्याने घरातच गळफास घेऊन जीवनाचा अंत केला.
घटनेची माहिती मिळताच पहूर पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. मृतदेहाचे पहूर ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ. भूषण पाटील यांनी शवविच्छेदन केले.
याप्रकरणी पहूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद कठोरे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकाश पाटील पुढील तपास करीत आहेत.
.jpg)
Post a Comment
0 Comments