बाळू जोशी-वाकडी.ता.जामनेर.
दिशा लाईव्ह न्यूज --::--- सध्या शेतकरी बांधवांना आज
ऑगस्ट महिन्यापासून सुरू झालेला पाऊस अधूनमधून पडत राहिला,सप्टेंबरमध्येही पावसाच्या सरींनी शेतकरावर धांदल्यावर थोडेसे संकट आणले,तर ऑक्टोबरमध्ये पावसाने उघडीप दिली,अतिवृष्टी आणि पूरस्थितीतून वाचलेल्या कापूस, मका, सोयाबीन आणि तूर पीक शेतकऱ्यांच्या हाती लागले.
मात्र,शासनाच्या सीसीआय आणि नाफेडच्या खरेदी केंद्रांची अनुपलब्धता शेतकऱ्यांसाठी मोठा प्रश्न ठरला आहे.
जामनेर आणि पाचोरा तालुक्यात यावर्षी पांढऱ्या सोन्याप्रमाणे ओळखल्या जाणान्या कापसाची लागवड मोठ्या प्रमाणात झाली होती,तसेच पिवळे सोने म्हणला जाणाऱ्या मक्याची लागवड अधिक गतीने होती.
या वर्षी अधिक तुलनेत मका लागवड झाली होती ,पिकांची स्थिती सुरुवातीला उत्कृष्ट होती. ज्यामुळे शेतकऱ्यांनी मोठे उत्पादन मिळेल असे वाटत होते परंतु त्यांना चांगला लाभ होईल, असा विश्वास बाळगला होता.
मात्र, सप्टेंबर महिन्यातील ढगफुटीसारख्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या प्रयत्नांचा परिणाम क्षणात नष्ट झाला.मक्याचे दाणे काळवंडले,अनेक कणसे भरल्या गेल्या नाहीत,ज्या भरल्या होत्या त्यावर अतिपावसामुळे कोम फुटले, त्यामुळे उत्पन्न खूप घटले,कापूस
व सोयाबीन पिकांबाबतही हाच परिणाम दिसून येत आहे.पाऊस थांबल्यानंतर शेतकऱ्यांनी कापूस आणि मका विक्रीसाठी काढले, मात्र,शासनाचे खरेदी केंद्र उपलब्ध नसल्यामुळे खासगी व्यापारयांनी विविध कारणे देत माल खरेदी करणे सुरू केले,
कापूस ७७१० ते ८११० रुपये प्रतिक्विंटल असतानाही व्यापान्यांनी ६००० ते ६२०० रुपये प्रतिक्विंटल दराने खरेदी सुरू केली आहे,मक्याला हमीभाव २२०० ते २२८० रुपये प्रतिक्विंटल असूनही स्थानिक व्यापारी शेतकऱ्यांकडून ११०० ते १३१० रुपये दराने खरेदी करत आहेत.
शेतकऱ्यांच्या मते, ही परिस्थिती त्यांच्यासाठी मोठा आर्थिक फटका ठरत आहे,पिकांच्या चांगल्या उत्पादनाचे स्वप्न पाहणाऱ्या शेतकऱ्यांना आली आपली मेहनत आणि आर्थिक गुंतवणूक कमी भावात विकावी लागण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे,शेतकऱ्यांनीसाठी शासनाने तातडीने मार्ग काढून परिस्थिती सुधारण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


Post a Comment
0 Comments