पहूर प्रतिनिधी--::--र (ता. जामनेर)
दिशा लाईव्ह न्यूज --::-- जळगाव–छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय महामार्गावरील अतिक्रमण हटाव मोहिमेला दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे. या निर्णयामुळे पहूर येथील व्यावसायिक व व्यापारी वर्गामध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण उपविभाग, जालना यांच्या वतीने गेल्या सोमवारी आणि मंगळवारी पहूर कसबे परिसरात अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आली. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना मध्यरेषेपासून १५ मीटर अंतरावरील अतिक्रमण हटविण्याची कारवाई करण्यात आली. या दोन दिवसांत अनेक दुकाने जमीनदोस्त करण्यात आल्या.
मात्र, उर्वरित अतिक्रमणांवरची कारवाई दिवाळीनंतर करण्यात यावी, अशी मागणी स्थानिक व्यावसायिक बांधवांनी केली होती. ही मागणी ठामपणे मांडल्यानंतर अखेर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने अतिक्रमण हटाव मोहिमेस तात्पुरती स्थगिती दिल्याचे अभियंता श्री. कामेकर यांनी सांगितले.
दरम्यान, ज्या व्यावसायिकांचे अतिक्रमण नुकतेच हटविण्यात आले आहे, त्यांच्यात मात्र ऐन दिवाळीच्या तोंडावर झालेल्या या कारवाईबद्दल तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

Post a Comment
0 Comments