शिवाजी सुतार- बांबरुड, ता.पाचोरा
दिशा लाईव्ह न्यूज--::--बांबरुड राणीचे येथील कर्ज बाजारीपणामुळे तसेच शेती पिकांचे अतिनुकसान झाल्यामुळे येथील तरुण शेतकऱ्याने विषारी औषध प्राशन करून आत्महत्याकेली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की,शेती निसर्गाच्या लहरीपणामुळे तर पावसाच्या मनमानीमुळे परिसरात शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले तर हाता तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला यामुळे मका कापूस केळी अशा पिकांचे अतोनात नुकसान झाल्याने शेती मशागतीस लागलेला खर्च व पिकांना आलेला खर्चाची भरपाई सुद्धा हाती न आल्या शेतकरी वर्गात डोळ्यासमोर मोठे संकट उभे राहिले आहे.
पुरेशी उत्पन्न न आल्याने शेतकऱ्यांच्या उत्पादनात घट आली. यामुळे शेतकरी हवालदील झाला असून कर्ज फेडावे की पोट भरावे अशा कैचीत सापडला असता शेतकरी वर्ग हवालदील झाला असून एका बाजूने शेतीचे नुकसान तर दुसऱ्या बाजूने डोक्यावर असलेले कर्ज यामुळे शेतकरी वर्गासमोर एकच उपाय म्हणजे स्वतःची आत्महत्या याच विवांचलित असताना येथील तरुण शेतकरी अनिल जयसिंग राजपूत (वय वर्ष ४८) आपल्या परिवाराचा उदरनिर्वाहासाठी शेतीसोबतच टेलर कामाचा व्यवसाय करत होता.
परंतु यावर्षी निसर्गाच्या लहरीपणामुळे पावसाच्या मनमानीपणामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेआपल्या शेतातील एक परिस्थिती पाहत व झालेले नुकसान पाहून दि. १३ ऑक्टोबर २०२५ रोजी विषारी औषध सेवन केले असता जळगाव येथील शासकीय रुग्णालयात उपचार घेत असताना दिनांक १४ ऑक्टोबर रोजी दुःखद निधन झाले .
तर मोठ्या शोकाकुल वातावरणात दिनांक १५ ऑक्टोबर रोजी अंत संस्कार करण्यात आले. ऐन दिवाळीच्या उत्सवात कर्जबाजारीपणामुळे अनिल जयसिंग राजपूत या शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना घडल्याने परिवारावर मोठा आघात होऊन दुःखाचा डोंगर कोसळला मयताच्या पश्चात एक मुलगा दोन मुली भाऊ पत्नी असा मोठा परिवारासून गावात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे .
मयत शेतकऱ्याच्या वारसा शासकीय मदत मिळावी अशी ग्रामस्था तर्फे मागणी करण्यात येत आहे

Post a Comment
0 Comments