दिशा लाईव्ह न्यूज --::-- पहूर (ता. जामनेर) – लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दिनाचे औचित्य साधून पहूर पोलीस ठाण्याच्या वतीने ३१ ऑक्टोबर रोजी ‘रन फॉर युनिटी’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमात पोलीस अधिकारी, कर्मचारी, शालेय विद्यार्थी, खेळाडू आणि पहूरकर नागरिक उत्साहाने सहभागी झाले.
राष्ट्रभक्ती आणि राष्ट्रीय एकतेचा संदेश देणाऱ्या या धाव उपक्रमाचे मार्गदर्शन सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद कोठारे यांनी केले. तर पोलीस उपनिरीक्षक भरत दाते, पोलीस कर्मचारी, सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयाचे विद्यार्थी आणि क्रीडा शिक्षक हरिभाऊ राऊत व शंकर भामेरे यांचा सहभाग लक्षणीय होता.
‘रन फॉर युनिटी’ची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज चौक, डॉ. दादासाहेब एम. आर. लेले, पहूर बस स्थानक येथून झाली. या धाव स्पर्धेचा समारोप पहूर पोलीस ठाण्याच्या मैदानावर झाला. समाजात राष्ट्रीय एकात्मतेचा आणि देशप्रेमाचा संदेश पोहोचविणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.

Post a Comment
0 Comments