Type Here to Get Search Results !

लासगाव येथील शेतकऱ्याच्या चार म्हशी दोन पारडू सह गुरे चोरून चोरटेपसार शेतकऱ्याचे लाखो रुपयाचे नुकसान



 शिवाजी सुतार-:-बांबरुड राणीचे 

 दिशा लाईव्ह न्यूज ----::-----   काल रात्री शेतकऱ्याच्या शेडमधून चार म्हशी व दोन वगारीसह चोरट्यांनी हात सफा करून गुरे चोरल्याची घटना घडल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले यामुळे परिसरातील शेतकरी भयभीत झाली असून या चोरट्यांचा तपास करून नुकसान ग्रस्त शेतकऱ्यास न्याय मिळावा अशी परिसरात मागणी होत आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, लासगाव येथील शेतकरी सुधाकर प्रेम राज पाटील तथा गुजर यांचे लासगाव बांबरुड रस्त्यावर शेती असून शेतात गुरांसाठी कंपाउंड सहित शेड बांधले आहे.

 त्या शेडमध्ये नियमित प्रमाणे आपले गुरे बांधत असताना काल रात्री 30 ऑक्टोबर रोजी रात्रीच चोरट्यांनी जाळी तोडून शेडमध्ये बांधलेल्या चार म्हशी त्याचप्रमाणे दोन वगारी सोडून गुरांना आड मार्गे शेतातून सामनेर ते बांबरुड मधल्या रस्त्याने असलेल्या शिनकर यांच्या शेड पर्यंत नेऊन सर्व जनावरे गाडीत भरून चोरटे पसार झाले.



 नियमितपणे शेतकरी शेतात आले असता सदर घडलेला प्रकार शेतकऱ्याच्या लक्षात आले सदर शेतकऱ्यांनी गुरांचा शोध घेतला असता मिळून आले नाही सदर गुरांना शेती शिवारातूनच नेल्याच्या खुणा दिसून आले. यामुळे शेतकऱ्याच्या पायाखालची वाळूच सरकली.

 अगोदरच शेतकऱ्यांना निसर्गाचा भडीमार तर परिसरात चोरट्यांचा हाहाकार माजला असून सदर नुकसानग्रस्त शेतकऱ्याचे अंदाजे सहा ते सात लाखाचे नुकसान झाले.

 या चोरट्यांमुळे परिसरात भीती निर्माण झाल्या असून या चोरट्यांचा शोध घेऊन त्यांचा बंदोबस्त करण्यात यावा सदर नुकसानग्रस्त शेतकऱ्यास शासनातर्फे मदत मिळावी नुकसान भरपाई मिळावी अशी परिसरात अपेक्षा व्यक्त केली जात आहे .

परिसरात चोरट्यांचे थैमान वाढल्या असून संबंधित विभागाने त्वरित कार्यवाही करावी, अशीही मागणी जोर धरत आहे.

Post a Comment

0 Comments