Type Here to Get Search Results !

वक्तृत्वाची साधना व्यक्तीला मोठं   बनविते - प्राचार्य डॉ . संजय भोळे शेंदुर्णी येथे मुख्याध्यापक संघाच्या  तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात!! कुणाल पाटील , ज्ञानदा बारी , वेदिका पांडे यांची जिल्ह्यावर निवड *.



पहूर प्रतिनिधी-- ता जामनेर

 दिशा लाईव्ह न्यूज--::--   वक्तृत्वाची साधना व्यक्तीला मोठी बनवते , विद्यार्थ्यांमध्ये वक्तृत्व कलेची जोपासना होण्यासाठी वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन होणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन शेंदुर्णी येथील आचार्य गजाननराव रघुनाथराव गरुड महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ .संजय भोळे यांनी केले . 

जळगाव जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघातर्फे आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी अध्यक्ष स्थानावरून ते बोलत होते . 

         शेंदुर्णी येथील स्वर्गीय शेठ राजमल लखीचंद ललवानी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयात शनिवारी तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले .

   प्रारंभी सरस्वती देवीच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले . 

 प्राथमिक गटाचे परीक्षण सुदाम गुजर , नितीन कुलकर्णी , विजय लहासे यांनी केले . माध्यमिक गटाचे  परीक्षण सुनीता इंगळे मधुकर सोनवणे यांनी तर  लक्ष्मण मोहने ,शंकर भामेरे आणि विनोद वाघ यांनी उच्च माध्यमिक गटाचे परीक्षण केले .

समारोपीय सत्रास   प्रमुख पाहुणे म्हणून मुख्याध्यापक संघाचे तालुका अध्यक्ष पी .टी खलसे  , विद्या परिषदेचे आर .ए . पाटील , आचार्य गजाननराव रघुनाथराव गरुड माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक आर . एस . चौधरी उपस्थित होते .महाराष्ट्र राज्य समता शिक्षक परिषदेतर्फे त्यांना महात्मा ज्योतिबा फुले गुणवंत शिक्षक राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला . 

यावेळी परीक्षकांमधून लक्ष्मण मोहने यांनी मार्गदर्शन केले .सूत्रसंचालन विजय नाईक यांनी तर आभार प्रदर्शन पंकज बोरसे यांनी मानले . यावेळी तालुकाभरातून शिक्षक मुख्यध्यापक पालक विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते . स्व . शेठ रा . ल . ललवानी प्राथमिक , माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले .


असे आहेत विजेते -

प्राथमिक गट

प्रथम क्रमांक -कुणाल विजय पाटील ( न्यू इंग्लिश स्कूल जामनेर )

द्वितीय क्रमांक - कोहिनुर हेमंतकुमार मोरे (इंदिराबाई ललवानी विद्यालय जामनेर )

तृतीय क्रमांक -हिंदवी वसंत गांगुर्डे (नि .प . पाटील विद्यालय पळसखेडा मिराचे )


माध्यमिक गट

प्रथम क्रमांक - ज्ञानदा कडोबा बारी (श्रीकृष्ण माध्यमिक विद्यालय शेंदुर्णी )

द्वितीय क्रमांक -चंचल वसंत गांगुर्डे (नि .प .पाटील विद्यालय पळासखेडे मिराचे )

तृतीय क्रमांक प्रशांत रवींद्र पाटील (जनता हायस्कूल नेरी )

उच्च माध्यमिक गट

प्रथम क्रमांक -

वेदिका शांतीलाल पांडे (जनता हायस्कूल नेरी )

द्वितीय क्रमांक -

वेदिका समाधान कुंभार ( स्वर्गीय शेठ रा .ल . ललवाणीउच्च माध्यमिक विद्यालय शेंदुर्णी )

तृतीय क्रमांक -

शरयू पांडुरंग थोरात (आचार्य गजाननराव गरुड माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय शेंदुर्णी )

Post a Comment

0 Comments