दिशा लाईव्ह न्यूज --::--- सिल्लोड शहर परिसरातील शिक्षक काॅलनी येथे गेल्या दोन दिवसांपासून एक अनोळखी तरुण मुलगी रात्री बे रात्री फिरत असल्याने सिल्लोड पोलीसांना स्थानिक नागरिकांनी कळवली असता ,पोलिसांनी महिलेच्या सुरक्षेच्या दृष्टीने तात्काळ शिक्षक काॅलनी येथे जाणवु बघीतले.
ती तरुणी जोरजोरात ओरडत होती. ती बेवारस अवस्थेत फिरत असल्याने.खूप हिंसक झाली होती. तीस पोलीसांनी तात्काळ पोलीस स्टेशन सिल्लोड शहर येथे आनले असता ,ती लघुशंकेसाठी जाते असे महिला पोलीस कर्मचारी यांना सांगितले व ती पोलीस स्टेशन सिल्लोड येथुन पळवुन गेली.
तात्काळ पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली .आठवडी बाजार असल्याने धावपळ उडाली. ती ६ तास शोधाशोध घेऊन अखेर ती सील्लोड बस स्थानक परिसरात ३६ एकर परिसरात पाण्याच्या कामासाठी ठेवलेल्या रिकाम्या पाईपामध्ये लपवुन बसली होती.
तीस महिला पोलिस कर्मचारी यांनी विश्वासात घेत तीला तीचे नाव, गाव विचारले व तीने आपले नाव हे साक्षी सोनवणे असे सांगीतले. व पत्ता सांगत नसल्याने वरिष्ठ पोलिस निरीक्षक शेशराव उदार यांनी नातेवाईक यांचा शोध घेत आहे.परंतु ती भोळसर वाटत असल्याने तीस सिल्लोड ग्रामीण रुग्णालय येथे प्रथोमचाराकरीता पाठवले असता डॉक्टर यांनी तपासून तिचे कोणीही नातेवाईक मिळत नसल्याने,तिच्या सुरक्षेच्या व मानवतेच्या दृष्टीने तिचे पुनर्वसन होण्यासाठी योग्य कारवाई होण्याबाबत श्री उदार पोलीस निरीक्षक सिल्लोड यांनी महिलेच्या सुरक्षेच्या दृष्टीने तीच्या पुनर्वसनासाठी पुढे आल्या व मनोरुग्णासाठि काम करणाऱ्या सु-लक्ष्मी सेवाभावी संस्थेचे सुमित पंडित यांना सदर महिलेची माहिती दिली.
व पुणर्वसनासाठी सांगीतले असता माणुसकी समुहाच्या टिम ने तात्काळ मदतकार्या साठि पुढे आले. सुमित यांनी पोलीसांच्या मदतीने सदर महिलेस ग्रामीण रुग्णालय सिल्लोड येथे प्रथोमचाराकरीता दाखल केले व प्रथोमचार करुन कागदोपत्री पुर्तता करुन सदर महिलेस आपले माणुसकी वृध्द सेवालय गावंदरी तांडा जटवाडा रोड येथे अन्न वस्त्र निवारा याकरिता पुनर्वसनासाठी माणुसकी वृध्द सेवालयाच्या संचालीका पुजा पंडित यांनी जबाबदारी स्वीकारली व सदर महिलेस पोलीसांनी व माणुसकी समुहाच्या टिम ने मदतकार्य केले.
यात अप्पर पोलीस अधीकारी अन्नपुर्णा सींह, उप विभागीय पोलीस अधीकारी दिनेश कोल्हे,वरिष्ठ पोलिस निरीक्षक शेशराव उदार साहेब,मुंढे साहेब पोलीस उपनिरीक्षक,भुषन चौधरी,महिला कर्मचारी हिवराळे मॅडम भिवसने मॅडम व माणुसकी समुहाचे सुमित पंडित,विजय निंबाळकर,किरण पंडित,व वृध्दाश्रमाच्या संचालीका पुजा पंडित आदिनी मदतकार्य केले.
----------------------------------------------------
एक सामाजिक दायित्व व कर्तव्य म्हणुन मनोरुग्ण महिलेला पुनर्वसनासाठी मदत केली.
सदर महिलेला नातेवाईक शोध घेत असल्याने सिल्लोड पोलीस स्टेशन हद्दीमध्ये.हद्दीमध्ये सापडलेल्या महिला नामे साक्षी एक सामाजिक दायित्व व कर्तव्य म्हणुन मदत केली.
ती आजाराने पीडित आहेत.हा त्यांचा गुन्हा आहे का ? समाजाने वाळीत टाकलेल्या ह्या महिलांवर शारीरीक आत्याचार होत नसतील का ? अमानुष लोकांच्या वासनेच्या शिकार झालेल्या ह्या महिलांपासून जन्माला आलेल्या अनाथ मुलांचा भार कोणी सांभाळावा ? प्रश्न ह्या एका महिलेचाच नाही,तर अजून कितीतरी असतील.ज्या अशाच अबोध आपल्या देहाला बेशुद्ध मिरवत असतील समाजातील वाईट नजरे सामोर.मग यांच्यासाठी एक मायेचं आपुलकीचं घर आहे का ? समाजाच दायित्व काहीच नाही का ? जीवनात संकट सांगून येत नसतात.आपण आपल्या मर्यादा जर खरच वाढवल्या आणि मदतीचा हात सामाजिक संस्थाना लावला,जे अशा स्वरूपाचं काम करण्यास उभे होत आहेत.तेव्हा खऱ्या अर्थाने मनोरुग्णाचा मानसिकतेत स्थिरता येईल.आणि समाजाची खरी मानसिक विकृत वृत्ती नष्ट होईल.
----श्री शेषराव उदार,वरिष्ठ पोलिस निरीक्षक सिल्लोड शहर,

Post a Comment
0 Comments