दिशा लाईव्ह न्यूज-:- आज लोहारा, ता.पाचोरा येथे राष्ट्रीय संत तेली समाजाचे आराध्यदैवत व संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांची 401 वी जयंती मोठ्या उत्साहात संपन्न झाली.
लोहारा येथील सामाजिक कार्यकर्ते नाना चौधरी ,श्रीराम चौधरी,प्रल्हाद चौधरी यांनी सपत्नीक संताजी महाराजांचा प्रतिमेची पुष्पहार घालून पूजन करण्यात आले.
यावेळी गावातून समाज बांधवांनी सवाद्य मिरवणूक काढण्यात आली.
भक्ती गीतांच्या संगीतमय गीत गाऊन मिरवणूक काढण्यात आली. शिस्तबद्ध मिरवणुकीचे ग्रामस्थांनीही कौतुक केले.
मिरवणुकीची सांगता संताजी चौकात करण्यात आली.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते व मा.सरपंच अमृत चौधरी, ग्राम पंचायत सदस्य कैलास चौधरी, यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी त्यांनी संताजीच्या जीवनातील काही प्रसंग उपस्थित समाज बांधवांना सांगितले.
कार्यक्रमानंतर सर्व समाज बांधवांनी स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला.
यावेळी संताजी युवा मंचच्या सर्व सदस्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीसाठी परिश्रम घेतले.







Post a Comment
0 Comments