दिशा लाईव्ह न्यूज -:- महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीच्या वतीने दिल्या जाणाऱ्या राज्यस्तरीय दर्पण पुरस्काराची घोषणा करण्यात आली.
यात विशेष बाब म्हणून यंदापासून राज्याच्या माहिती आणि जनसंपर्क विभागातील अधिकाऱ्यांनाही गौरविले जाणार आहे.
हा पहिलाच पुरस्कार पुण्याचे जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील यांना जाहीर झाला आहे. ही पुणेकरांसाठी अभिमानाची गोष्ट आहे.
याबद्दल डीआयओ युवराज पाटील यांचे विशेष अभिनंदन. याचबरोबर विशेष दर्पण पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार राजीव साबडे यांना जाहीर झाला आहे.
मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ६ जानेवारीला हा पुरस्कार प्रदान सोहळा पार पडणार आहे.
पुरस्कार सन्मानित युवराज पाटील सर यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि भावी वाटचालीसाठी दिशा लाईव्ह न्यूज &परिवारातर्फे खूप खूप शुभेच्छा !

Post a Comment
0 Comments