Type Here to Get Search Results !

संस्कृती हरवली मार्गशीर्षातली वासुदेवाची स्वारी वासुदेव आला हो चा नांद झाला इतिहास जमा . बदलत्या जीवनशैलीमुळे उरल्या फक्त आठवणी


शोधक बातमी.....................

बाळू जोशी वाकडी.ता.जामनेर.दि.०९/१२/२५

 दिशा लाईव्ह न्यूज --::-- आज जळगावात एकेकाळी मार्गशीष महिना सुरु झाला की महाराष्ट्रातील गावा गावात आणि शहरामध्ये वासुदेव परंपराच्या गजराची आठवण व्हायची वासुदेव आला वासुदेव आला असा मधुर नाद करत पारंपारिक वेशभूषा केलेले वासुदेव लोकांच्या दारात येऊन भजन कीर्तन आणि पोरानिक गीते सादर करायचे.

 मात्र बदलत्या जीवन शैलीमुळे आणि आधुनिकतेच्या वेगामुळे ही हजारो वर्षाची समृद्धी परंपरा आज केवळ एक आठवण बनवून राहिली आहे. 



पूर्वी वासुदेवाची स्वारी आली आमच्या दारी पूर्वी वासुदेवाची स्वारी आली आमच्या दारी म्हणत अबाल वृद्धासह बच्चे कंपनी वासु देवाच्या स्वागतासाठी उत्सुक असायची. पहाटे-सडा - सारवन करून महिला वासुदेवाच्या

स्वारीची आतुरतेने वाट पहात सकाळी दानाने दिवसाची सुरुवात झाली. तर तो दिवस शुभजातो अशी त्या मागची पवित्र भावना होती. वासुदेव दारी आला की खूप आनंद व्हायचा भल्या सकाळी टाळ चिपळ्यांचा तो मंजुळ नांद घरातील वातावरण प्रसन्न करायचा सूर्यकिरणांच्या छटा अंगणातील सडा रांगोळी पारिजात काचा सुगंध आणि अशा वासुदेवाचे कीर्तन गवळण मनाला वेगळाच आनंद देत असे,

पुराना मध्ये वासुदेव परंपरेचा उल्लेख !

वासुदेव परंपरेचा उल्लेख पुराना मध्येही आढळतो

वासुदेव हे श्रीकृष्णाच्या वडिलांशी जोडलेले असून त्यावर आधारित गाणी गावागावा सादर होऊ लागली. विशेषतः पेशव्याच्या काळात (१७-व्या १८ व्या शतकात) या परंपरेला भरभराट मिळाली. धार्मिक उत्सवामध्ये वासुदेवाचे गायन समाजाला धर्म संस्कृती आणि नैतिक मूल्य शिकवणारे ठरले, त्यामुळे ही परंपरा सांस्कृतिक दृष्टी ही अत्यंत महत्वाची ठरते, आधुनिक काळात जीवन व्यस्त झाले,आणि ही सुंदर स्वारी हळूहळू इतिहासात जमा झाली,

आनंद लोक पावत चाललाया




वासुदेवाचे स्वरूप आणि अध्यात्मिक संदेश वासुदेव प्राचीन वारकरी परंपरेतील एक महत्त्वाचा घटक आहे,ते डोक्यावर मोराच्या पिसा चा टोप व रंगीत फेटा गळ्यात मोत्याच्या माळा अंगावर झगा धोतर आणि हातात टाळ-चिपळ्या घेऊन आपल्या गाण्याच्या घे घे घे हरिनाम घे, माया सारी सोडून दे, या संसारा पायी. 

या माध्यमातून धार्मिक संदेश नौकापर्यंत पोहोचवण्याची त्यांच्या गायनात रामायण महाभारत तसेच भगवान श्रीकृष्णाच्या जीवनातील प्रसंगाचा समावेश असायचा त्यामुळे लोकांना अध्यात्मिक प्रेरणा मिळायची गेल्या काही वर्षापर्यंत ग्रामीण भागासह शहरामध्ये ही वासुदेव परंपरा उत्साहाने टिकून ती घरोघरी त्यांचे उत्साहाने स्वागत करायचे आणि लोक त्यांना पैसे अनधान्य किंवा कपडे दान देत असं या परंपरेमुळे केवळ श्रद्धा आणि संस्कृती जपली जात होती.



Post a Comment

0 Comments