दिशा लाईव्ह न्यूज --::-- लोहारा ता. पाचोरा येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जेष्ठ कार्यकर्ते हिंदू सूर्य धर्मवीर स्व. गुणवंत दत्तात्रय क्षीरसागर यांच्या द्वितीय पुण्यतिथी दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन लोहारा येथील जिल्हा परिषद मराठी मुलांच्या शाळेत आज करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला रक्तदान शिबिरात भारत मातेचे व स्व. गुणवंत क्षीरसागर यांच्या प्रतिमेचे पूजन करून शिबीराची सुरुवात करण्यात आली. यावेळी 21 रक्तदात्यांनी आपले अमूल्य रक्तदान करून खऱ्या अर्थाने आदरांजली वाहिली.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्याणी वर्मा मॅडम ह्या होत्या.
त्यांनी तरुणांना संदेश दिला की "रक्तदान ही काळाची गरज असून प्रत्येकाने आपली सामाजिक जबाबदारी म्हणून रक्तदान केलेच पाहिजे व वाहन चालवताना नेहमीच हेल्मेट व नियम पाळावे" असा मौलिक सल्ला दिला.
यावेळी समाजसेवक तथा पत्रकार गजानन क्षीरसागर, रमेश लिंगायत यांनीही स्वर्गीय गुणवंत क्षीरसागर यांना आपल्या भाषणातून आदरांजली वाहिली.
यावेळी 21 रक्तदात्यांनी आपले बहुमूल्य ही मूल्य रक्तदान केले यामध्ये भिका जाधव ,हेमंत गुरव,मनोज अंबिकार,गोपाल पांढरे,अशोक चौधरी, उत्कर्ष क्षीरसागर, राजेंद्र गीते, प्रवीण चौधरी, गजानन गोंधळे, संतोष पाटील, दीपक पाटील, निलेश न्हावकर यांनी आपले रक्तदान केले.
यावेळी भाजपाचे जेष्ठ नेते शरद सोनार, ग्रामपंचायत सदस्य कैलास चौधरी, उपसरपंच दीपक खरे, पत्रकार गजानन क्षीरसागर, चंद्रकांत पाटील,विकासोचे मा.चेअरमन सुनील क्षीरसागर, अनंत क्षीरसागर,रवींद्र क्षीरसागर, संतोष कोळी, शिवाजी गोसावी, श्रीकृष्ण माळी, अमोल पाटील, गोपाल पाटील, निलेश जोशी, पत्रकार, पोलिस दूरक्षेत्र असिस्टंट सब इन्स्पेक्टर अरविंद मोरे, पोलीस कॉन्स्टेबल योगेश भीलखेडे, वाडीले साहेब,हे उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, बजरंग दल, रामराज्य फाउंडेशन, माणुसकी ग्रुप गावकरी मंडळी यांनी सहकार्य केले.




Post a Comment
0 Comments