दिशा लाईव्ह न्यूज --::-- जामनेर तालुक्यातील पहूर येथे संताजी जगनाडे महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त समस्त तेली समाज व ग्रामस्थांच्या सहकार्याने जय भवानी माता मंदिर, पहूर कसबे येथे आयोजित अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताहाला आज, बुधवारपासून उत्साहात प्रारंभ झाला.
कार्यक्रमात ह. भ. प. नंदलाल महाराज नामपुर, ह. भ. प. युवराज महाराज दोंडाईचा, ह. भ. प. शांताराम महाराज शेंदुर्णी, ह. भ. प. सदानंद महाराज धामणगावकर, ह. भ. प. विष्णू महाराज मेहकर, ह. भ. प. जितेंद्र महाराज सोयगाव तसेच ह. भ. प. ज्ञानेश्वर महाराज आळंदी यांचे प्रवचन व कीर्तन होणार आहे.
सप्ताहाची सांगता पहूर येथील ह. भ. प. मुकुंद महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनाने होणार असून पालखी सोहळ्याने सप्ताहाचा समारोप करण्यात येईल. तसेच दुपारी महाप्रसादाचे आयोजनही करण्यात आले आहे.
परिसरातील सर्व भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

Post a Comment
0 Comments