Type Here to Get Search Results !

महावीर गोशाळेचे अध्यक्ष प्रदीप लोढा यांचा विश्व हिंदू परिषदेतर्फे गौरवपूर्ण सत्कार!


पहूर प्रतिनिधी-:-, ता. जामनेर :

 दिशा लाईव्ह न्यूज। --::–-- पहूर परिसरात ‘गो सेवा हीच ईश्वर सेवा’ हे तत्त्व मनापासून जोपासत समाजामध्ये गोसंवर्धनाची भावना दृढ करण्यासाठी महावीर गोशाळेची स्थापना करून सातत्याने निस्वार्थ सेवा करणारे महावीर गोशाळेचे अध्यक्ष प्रदीप लोढा यांचा विश्व हिंदू परिषद, जळगाव यांच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला.


गोमातेसाठी निवारा, अन्न, आरोग्यसेवा आणि स्वच्छतेची उत्तम सोय उपलब्ध करून देत लोढा यांनी गेल्या काही वर्षांत गोशाळेला आदर्श केंद्र म्हणून उभे केले आहे. गोसेवा, गोसंवर्धन आणि ग्रामीण समाजात पशुप्रेमाची जागृती घडवण्याच्या त्यांच्या प्रयत्नांची दखल घेऊन विश्व हिंदू परिषद, जळगाव विभागाने हा सत्कार सोहळा आयोजित केला.




कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी लोढा यांच्या कार्याचे मनापासून कौतुक करत, समाजातील इतरांनीही गोसेवा व संरक्षणासाठी पुढे यावे, असे आवाहन केले.

महावीर गोशाळेमार्फत प्रदीप लोढा यांनी केलेले श्रमदान, आर्थिक नियोजन, दुर्बल अवस्थेतील जनावरांची काळजी आणि गोसंवर्धनासाठीची कटिबद्धता यामुळे त्यांना हा सन्मान प्राप्त झाला आहे.


सत्कार सोहळ्यात उपस्थितांनी त्यांच्या भविष्यातील गोसेवा उपक्रमांना शुभेच्छा देत, समाजहितासाठीचे हे योगदान प्रेरणादायी असल्याचे नमूद केले.

Post a Comment

0 Comments