Type Here to Get Search Results !

३८ वर्षांनंतर जुन्या आठवणींना उजाळा देऊन विद्यार्थी झाले भावूक लोहारात माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा श्री क्षेत्र तपेश्वरला उत्साहात



दिशा लाईव्ह न्यूज    --::--  दिनेश चौधरी, लोहारा-स्नेहसंमेलन म्हणजे मित्रांच्या भेटीगाठी, जुन्या आठवणींचा ठेवा आणि कलागुणांना वाव देणारे एक अविस्मरणीय व्यासपीठ आहे, जिथे विद्यार्थी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांतून (गाणी, नृत्य, नाटक) एकत्र येतात, त्यांच्यातील मैत्री अधिक घट्ट होते आणि शाळा जीवनातील आनंद द्विगुणित होतो; यातून केवळ मनोरंजनच नाही, तर एक सामाजिक आणि सांस्कृतिक संस्कारही घडतात, ज्यामुळे आयुष्यभराच्या आठवणी तयार होतात. 


पाचोरा तालुक्यातील लोहारा येथील त्याकाळी असलेल्या न्यू इंग्लिश स्कूल लोहारा (आताच्या डॉ.जे.जी. पंडित, मा. वि. लोहारा) या विद्यालयातील माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा लोहारा येथील पवित्र तीर्थक्षेत्र श्री तपेश्वर महाराज मंदिराजवळ नुकताच  निसर्गाच्या सानिध्यात उत्साहात साजरा झाला. 

यावेळी १९८७-८८ वर्षातील दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांना आमंत्रित केले होते. हा स्नेह मेळावा तब्बल  ३८वर्षांनी झाल्याने जुन्या आठवणींना उजाळा देऊन मित्र मैत्रिणी भाऊक झाले होते. स्नेहमेळाव्यासाठी महाराष्ट्राच्या विविध भागातून आलेल्या विद्यार्थ्यांनी व मित्र-मैत्रिणीनी शाळेतील गुरुजनाबाबत कृतज्ञता व्यक्त करीत मनोगते व्यक्त केली. 




कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्वर्गीय गुरुजनांना व वर्गमित्रांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तसेच शाळेची नियमित प्रार्थना खरा तो एकचि धर्म, जगाला प्रेम अर्पावे' या प्रार्थनेने करण्यात आली.


 शाळेतील माजी विद्यार्थी सध्या विविध पदावर कार्यरत आहे. त्यांच्या भेटीने खूप आनंद झाला, असे मान्यवरांनी आवर्जून सांगितले.


. कार्यक्रमाला संजय काकडे,  सुरेश निकुंभ, दिनेश चौधरी, कैलास कासार, देविदास चौधरी, युवराज चौधरी, रवींद्र चौधरी, विद्या कुलकर्णी, छाया जगताप, वैशाली निकुंभ, ललित पाटील, भाऊराव अहिरे, जितेंद्र पालीवाल, प्रवीण निकुंभ, पुष्पा चौधरी, विवेक महाले, रवींद्र पाटील, माधव पवार, नंदा देशमुख, प्रिती वाघ, सुरेश गवांदे, क्रांती शेळके,  सुनीता जगताप,मकराम राठोड, किसन राठोड, भास्कर पाटील, वंदना पाटील, अनिल सुतार, ज्ञानेश्वर बोरसे, हिरालाल पाटील, अनिल निकुंभ, अशोक सुरवाडे, शामराव तायडे, सुनील पाटील, संजय जगताप, किसन पाटील, अमृत पाटील-म्हसास, सुकलाल राजपूत, दगडू चौधरी, रामदास कोळी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. 



कार्यक्रमानंतर सुरुची भोजनाचा आस्वाद उपस्थित मान्यवरांनी घेतला. तसेच सर्व उपस्थिती भगिनींना संजय काकडे यांच्याकडून प्रत्येकी  साडी भेट देण्यात आली.

Post a Comment

0 Comments