Type Here to Get Search Results !

पाचोरा शहर तेली समाज मंडळ तर्फे श्री संत जगनाडे महाराज यांच्या जयंती व पुण्यतिथी निमित्त अखंड हरिनाम किर्तन सप्ताह भव्य पालखी सोहळा चे आयोजन




दिशा लाईव्ह न्यूज --::----  पाचोरा शहर तेली समाज मंडळ पाचोरा तालुका पाचोरा तर्फे तेली समाजाचे आराध्य दैवत श्री संत संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंती 401 व समाधी सोहळा निमित्त अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह व भव्य पालखी सोहळा चे आयोजन करण्यात आले आहे.

 साधू संतांच्या आशीर्वादाने व ह. भ. प .श्री किशोर महाराज मोर दडकर यांच्या संकल्पनेतून तसेच ह .भ. प. श्री योगेश जी महाराज भागवताचार्य धामणगावकर ह .भ. प. सावता महाराज मोहाडीकर यांच्या अनमोल सहकार्याने अखंड हरिनाम किर्तन सप्ताह मार्गशीर्ष कृ 4 दिनांक 8- 12- 25 सोमवार ते मार्गशीर्ष कृ 12 दिनांक 16- 12 -25 मंगळवार पर्यंत आयोजित करण्यात आलेला आहे.


 सोमवार दिनांक 8 -12 -25 सकाळी आठ वाजता संताजी महाराज जयंती निमित्त महाराजांच्या प्रतिमेचे पूजन समाज कार्यालय व एम एम कॉलेज जवळ पाचोरा सकाळी नऊ वाजता कीर्तन सप्ताहाची विधीवत पूजा व मांडणी बुधवार दिनांक 17- 12 -25 सकाळी साडेआठ वाजता श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व महापूजा सकाळी साडेनऊ वाजता श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेचे सुशोभित पालखीतून भव्य मिरवणूक दुपारी बारा ते तीन वाजता सर्व समाज बांधव व भगिनींसाठी स्नेहभोजन महाप्रसाद सायंकाळी पाच वाजता गुणवंत विद्यार्थी बक्षी स वितरण समारंभ शुभ हस्ते समाजातील मान्यवर सोमवार दिनांक 8- 12- 25 ह भ प श्री स्वप्निल महाराज गिरड यांचे कीर्तन कीर्तनाचे सेवेकरी श्री प्रशांत उत्तमराव चौधरी, मंगळवार दिनांक 9- 12 -25 ह भ प श्री त्र्यंबक महाराज अकोट विनोदी सम्राट यांचे कीर्तन कीर्तनाचे सेवेकरी श्री अर्जुन रामदास चौधरी ,बुधवार दिनांक दहा-बारा 25 ह भ प श्री सावता महाराज मोहाडीकर यांचे कीर्तन कीर्तनाचे सेवेकरी श्री सुधाकर बाबूलाल चौधरी गुरुवार दिनांक 11 -12 -25 ह भ प श्री अमृत महाराज गाढे बेटावर यांचे कीर्तन कीर्तनाचे सेवेकरी श्री दत्तात्रय ओंकार चौधरी ,शुक्रवार दिनांक 12- 12- 25 ह भ प  सौ सुनीताताई पाटील यांचे कीर्तन कीर्तनाचे सेवेकरी श्री एकनाथ हिरामण चौधरी शनिवार दिनांक 13 -12 -25 ह भ प श्री विश्वनाथ महाराज वाडेकर विनोदाचार्य यांचे कीर्तन कीर्तनाचे सेवेकरी कै देवकाबाई भगवान चौधरी,

 रविवार दिनांक 14 -12 -25 ह भ प श्री सूर्यभान महाराज शेलगाव यांचे कीर्तन कीर्तनाचे सेवेकरी श्रीमती भारती देविदास चौधरी, सोमवार दिनांक 15 -12 -25 ह भ प श्री राजेंद्र महाराज कासोदा यांचे कीर्तन कीर्तनाचे सेवेकरी श्री श्रावण घमन चौधरी, मंगळवार दिनांक 16- 12 -25 ह भ प श्री गोविंद महाराज मठाधिपती यांचे काल्याचे किर्तन कीर्तनाचे सेवेकरी श्री विष्णू देवराम चौधरी, गायनाचार्य हभप किशोर महाराज पाचोरा ,हभप समाधान महाराज रहिपुरी ,मृदुंगाचार्य ह भ प प्रणव महाराज पाचोरा ,

हभप निखिल महाराज पाचोरा ,विणेकरी ह भ प कारभारी महाराज मोंढाळे, हार्मोनियम ह भ प देविदास महाराज थोरात पाचोरा, तबलावादक ह भ प सागर थोरात संगीत शिक्षक श्री  गो से हायस्कूल पाचोरा शंख नाद ह भ प बापू महाराज अहिरे पाचोरा पांडुरंग भजनी मंडळ कृष्णापुरी पाचोरा तसेच पंचक्रोशीतील भजनी मंडळ..

 तरी या कीर्तन सोहळ्याला सर्व कार्यक्रमांना आपण आपल्या परिवारासह मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, अशा प्रकारचे आवाहन पाचोरा तालुका तेली समाजाचे अध्यक्ष सतीश चौधरी उर्फ भोलाप्पा पाचोरा, शहराध्यक्ष नारायण चौधरी ,सचिव श्री शांताराम चौधरी, उपाध्यक्ष डॉक्टर उत्तम चौधरी ,सहसचिव शरद चौधरी, विश्वस्त प्रकाश चौधरी ,ज्ञानेश्वर चौधरी, पी एन चौधरी, बापू चौधरी,, मोतीलाल चौधरी ,संजय चौधरी, पंडित चौधरी ,सुधाकर चौधरी गोपाल चौधरी ,किशोर चौधरी ,दिनकर चौधरी, भरत चौधरी, संजय चौधरी, आबा चौधरी ,जगदीश चौधरी ,नितीन चौधरी ,प्रा सी एन  चौधरी,, जगन्नाथ चौधरी ,भालचंद्र चौधरी, शिवाजी चौधरी यांच्यातर्फे करण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments