Type Here to Get Search Results !

खान्देश तेली समाज मंडळाकडून अनोखा विवाह समारंभ!! अंध-अपंग, विधवा,विधुर, घटस्फोटीत यांचे सामुदायिक विवाह सोहळे घेणार!!




दिशा लाईव्ह न्यूज-:- - संपूर्ण महाराष्ट्रभर नावलौकिक असलेल्या महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त खान्देश तेली समाज मंडळाचे माध्यमातून वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येतात आजपर्यंत अनेक विविध उपक्रम राबवलेले आहेत. त्याचप्रमाणे अंध,अपंग, विधवा,विदुर,घटस्फोटीत यांचे विवाह जुळवून हे विवाह लावण्याचे कार्य मंडळाकडून केले जाते. याआधी मंडळाने चार विवाह लावलेले आहेत.आज मंडळाच्या माध्यमातून सर्वांच्या सहकार्याने हा विवाह लावण्यात आला. 



जळगाव येथील स्व.रतिलाल चौधरी यांचे चिरंजीव व श्री भटू भगवान चौधरी यांचे भाचे  चंद्रकांत व धुळे येथील श्री भगवान दिगंबर चौधरी यांची सुकन्या व राकेश भगवान चौधरी यांची भगिनी   मोनिका या दोन्ही घटस्फोटीतांचा मंडळाचे अध्यक्ष कैलास आधार चौधरी,सचिव रवींद्र जयराम चौधरी व पदाधिकाऱ्यांनी विवाह जुळवून आज मंडळाच्या माध्यमातून संत गाडगेबाबा समाज भवन,एकविरा देवी मंदिराजवळ हा विवाह लावण्यात आला.



मंडळाने दरवर्षी घटस्फोटीत,विधवा, विधुर,अंध,अपंग यांचा सामुदायिक विवाह सोहळा घेण्याचे ठरवलेले असून तो दरवर्षी यापुढे घेण्यात येईल. आज एकच विवाह लावला यापुढे अनेक विवाह लावण्याचा संकल्प यावेळी मंडळाचे सचिव रवींद्र जयराम चौधरी यांनी सांगितला.आजच्या या विवाह समारंभासाठी विनोद मंडप डेकोरेटर्स चे संचालक मंडळाचे जिल्हा उपाध्यक्ष विनोद राजु चौधरी,माजी शिक्षण सभापती संदीप तात्या महाले,नगरसेवक कैलास काळू चौधरी,परीट समाजाचे सचिव भोलाभाऊ सगरे,शशिकांत बळीराम चौधरी,राजेंद्र माधवराव बागुल यांनी विशेष सहकार्य केले.



यावेळी धुळे शहरातील सामाजिक कार्यकर्ते माजी महापौर सौ.प्रतिभाताई चौधरी,गिरीश राजाराम चौधरी,संदीप शिवदास चौधरी,सुभाष धर्मा जाधव,पोपट डोंगर चौधरी,विलास वसंत चौधरी, अशोक छगन चौधरी,विजय रामचंद्र चौधरी,पितांबर दादा महाले,महिला मंडळ अध्यक्ष सौ.कविता अहिरराव,सौ.रुपाली महाले यांच्यासह अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्यात.

या विवाह समारंभासाठी मंडळाचे शहराध्यक्ष राजेंद्र भटू चौधरी,सचिव किशोर पुंडलिक चौधरी,खजिनदार राजेंद्र भाईदास चौधरी,किरण श्रीराम बागुल, नितीन मोतीलाल चौधरी, नटराज बाबूलाल चौधरी, प्रमोद महादू चौधरी, शाम रामदास चौधरी,भाऊसाहेब चौधरी वरखेडी,अमोल हिरामण चौधरी यांनी विशेष परिश्रम घेतले.



Post a Comment

0 Comments