Type Here to Get Search Results !

वरखेडी येथे देहव्यापाराचा अड्डा उद्ध्वस्त; एकास अटक.. पिंपळगाव हरेश्वर पोलिसांची धडक कारवाई, गुन्हा दाखल.अवैध धंद्यांच्या विरोधात पोलिसांची बेधडक कारवाई.




दिशा लाईव्ह न्यूज--::--   पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील वरखेडी येथे एका इसमाने स्वतःच्या राहत्या घरात आर्थिक फायद्यासाठी अनैतिक देहव्यापार चालवून परिसरात कायदा, सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण केला होता.

 ही गुप्त माहिती मिळताच पिंपळगाव हरे. डॅशिंग आणि कर्तव्यदक्ष सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्याणी वर्मा यांनी ही बाब उपविभागीय पोलीस अधिकारी, पाचोरा विभाग यांच्या निदर्शनास आणून दिली होती.


सखोल माहिती मिळताच त्यांनी पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार यांच्या नेतृत्वाखाली स्वतंत्र पथक गठीत करून कारवाईचे आदेश दिले होते.


या आदेशानुसार पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्याणी वर्मा, पोलीस हेडकॉन्स्टेबल कॉन्स्टेबल अतुल पवार, अभिजित निकम, पोलीस नाईक राहुल बेहरे, पोलीस कॉन्स्टेबल नामदेव इंगळे, अमोल पाटील, दीपक सोनवणे, महिला पोलीस कॉन्स्टेबल योगिता चौधरी, वाहन चालक पोलीस कॉन्स्टेबल सागर पाटील तसेच दोन पंच व पंटर यांच्या पथकाने  दि.४ डिसेंबर २०२५ रोजी रात्री ९:३० वाजेच्या सुमारास  वरखेडी येऊन दोन पंच व पंटरच्या माध्यमातून वरखेडी येथील संबंधित घरात छापा टाकला.


पंटरच्या माध्यमातून टाकण्यात आलेल्या या छाप्यात वरखेडी येथील आरोपी हैदर शहा रशिद शहा (वय वर्षे ४५) हा स्वताच्या फायद्यासाठी आपल्या राहत्या घरात महिलांना बोलावून त्यांना अल्प मोबदला देऊन त्यांच्यामार्फत देहव्यापार करुन घेत कुंडणखाना चालवत असल्याचे रंगेहाथ आढळून आल्याने या प्रकरणी हैदर शहा याच्या विरोधात पोलीस हेडकॉन्स्टेबल अतुल पवार यांच्या फिर्यादीवरुन पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर ३५२/२०२५ अन्वये स्त्रिया व मुलींचा अनैतिक व्यापार (प्रतिबंध) अधिनियम १९५६ चे कलम ३, ४ व ५ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.



या गुन्ह्याचा पुढील तपास  कर्तव्यदक्ष सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्याणी वर्मा करीत आहेत. पोलिसांच्या या कारवाईमुळे परिसरात सुरू असलेल्या अवैध धंद्यांना चाप बसला असून नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. मात्र असाच प्रकार पाचोरा ते जामनेर रस्त्यावर असलेल्या ढाबा व हॉलमध्ये सुरु असून याठिकाणी कारवाई होणे गरजेचे आहे अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


तसेच पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनला सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्याणी वर्मा यांनी पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी अवैध धंद्याच्या विरोधात वॉश आऊट मोहीम सुरु केली असल्याने सर्वसामान्य जनतेच्या विशेष करुन महिलांच्या आशा पल्लवित झाल्या असून गावागावात सुरु असलेली अवैध दारुची विक्री, सट्टा पेढ्या, जुगाराचे हे कायमस्वरूपी बंद करण्यात आले पाहिजे म्हणजे गावागावात शांतता प्रस्थापित होईल व आमचे संसार सुखाचे होऊन आमची भावी पिढी या व्यसनाधीनतेपासून वाचेल अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

Post a Comment

0 Comments