Type Here to Get Search Results !

लोहारा येथे आज शहादावलशहा बाबांचा यात्रोत्सव!! तसेच कुस्त्यांच्या दंगलीचे आयोजन..नामांकित पहिलवान आज हजेरी लावणार.

 



दिशा लाईव्ह न्यूज। ----:::----येथे सालाबादाप्रमाणे यावर्षी देखील दत्त जयंतीच्या दिवशी शहादावलशहा बाबांचा ३०० वर्षांची परंपरा असलेला यात्रोत्सव आज  दि.४ डिसेंबर रोजी संपन्न होणार आहे. याच दिवशी सकाळी ११ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत लोहारा ग्रामस्थ मंडळातर्फे भव्य कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले आहे.


गावाच्या पश्चिमेला प्राथमिक आरोग्य केंद्रा जवळ शहादावलशहा बाबांची जागृत दर्गा असून दि. ३ डिसेंबर रोजी संध्याकाळी ६ वाजता बाबांचा संदल चढवण्यात आली असल्याची माहिती पुजारी शिंदे यांनी दिली. यात्रे बाबत माहिती देतांना त्यांनी सांगितले की, आमचे पंजोबा भिकनबाबा हे शहादावलशहा बाबांचे परमभक्त होते.

 शहादावलशहा बाबांनी प्रसन्न होऊन त्यांना दृष्टांत दिला. त्या दृष्टांतानुसार भिकनबाबांनी ३०० वर्षांपूर्वी दत्तजयंतीच्या पवित्र मुहूर्तावर बाबांच्या समाधीची विधिवत स्थापना केली म्हणून त्या दिवसापासून आजतागायत त्या स्थानावर वर्षानुवर्षापासून परंपरेप्रमाणे दरवर्षी दत्त जयंतीच्या दिवशी यात्रा भरते.


भिकनबाबानंतर शिंदे कडू बाबा शिंदे, राजाराम शिंदे व त्याच्या नंतर आज त्यांच्या परिवारातील सदस्य समाधीची विधिवत सेवा व देखभाल करीत असतात. यात्रेच्या आदल्या दिवशी संध्याकाळी भगत परिवारातर्फे गावातून वाजतगाजत संदलची मिरवणूक काढण्यात येते. यात्रेच्या दिवशी रात्री जागरण व्हावे म्हणून क्रांती सोनवणे डोनगावकर यांचा लोकनाट्याचा कार्यक्रम ठेवण्यात आला आहे.



 यात्रेनिमित्त गावातील घराघरातून बाबांना नैवैद्य म्हणून गोडभात (नियाज) चा नैवद्य दिला जातो. यात्रेत लहान मुलांसाठी पाळणे, मिठाईचे दुकाने, संसार व शेती उपयोगी साहित्य विक्रीसाठी आलेले असतात. या यात्रेत लोहारा परिसरातील कासमपूरा, म्हसास, शह परिवारातीलापुरा, रोटवद, रोटवद तांडा, म्हसास तांडा, कळमसरा लाख तांडा येथून मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात. ज्या भाविकांची मनोकामना पूर्ण झाली असे भाविक नवस फेडतांना दिसतात म्हणून या स्थनाला नवसाला पावणारा पिरोबाही म्हणतात.


एकमुखी दत्तमंदिरावर विविध कार्यक्रमः 



येथील महानुभाव पंथीयभाविकांतर्फे दत्तजयंती निमित्त दत्तमंदिरावर दि.४ डिसेंम्बर रोजी दत्तजयंती साजरी करण्यात येणार आहे. यावेळी बाबांच्या समाधीचे स्नान, विडा, अवसर, आरती व महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे. तरी सर्व भाविकांनी दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन महानुभाव बांधवांकडून करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments