सुनील लोहार.--कुऱ्हाड प्रतिनिधी.
दिशा लाईव्ह न्यूज --::-- कुऱ्हाड तालुका पाचोरा_पिंपळगाव हरे पोलीस ठाण्याअंतर्गत असलेल्या कुऱ्हाड परिसरात नियमित पोलीस गस्तीने भुरट्या चोऱ्या ना आळा बसला आहे .
लोहारा दूरक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या कुऱ्हाड, सांगवी ,नाईक नगर वाकडी, कोकडी शिवारात नेहमीच भुरट्या चोऱ्या होणे नित्यचे होते. वीज पंप,केबल वायरी,झटका मशीन आदी शेती उपयोगी वस्तू चोरी जाण्याचे प्रमाण वाढले होते यामुळे शेतकरी रडकुंडीत आला होता या कारणाने पिंपळगाव पोलीस स्टेशन च्या सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्याणी वर्मा यांच्या सूचनेवरून या परिसरात रात्रीची दररोज पोलीस गस्त वाढविण्यात आली असून यामुळे भुरट्या चोरांचा उपद्रव कमी झाला आहे.
ग्रामस्थ ,शेतकऱ्यांची लोहारा औट पोस्टला स्वतंत्र पोलीस वाहनाची मागणी.
पिंपळगाव पोलीस स्टेशन ला सद्या एकच वाहन असून या वाहनाने हद्दीतील सुमारे 53 गावांना रात्रीच्या वेळेस पोलिसांना गस्त घालणे म्हणजे चढा ओढीचे होते.
त्यात लोहारा दुरर्क्षेत्र पोलीस अंतर्गत 16 ते 17 गावे असून या गावांना स्वतंत्र पोलीस वाहन जर दिले तर, रात्रीची जास्त वेळेची नियमित पोलीस गस्तीची मागणी सतरा गावातील ग्रामस्थांनी केली आहे.जेणेकरून परिसरातील लहान मोठ्या चोऱ्याना आळा बसेल.


Post a Comment
0 Comments