दिशा लाईव्ह न्यूज --::-- आजची शेतकऱ्याची परिस्थिती कपाशी १२ते १५ रुपये प्रती किलो दराने कापूस वेचल्या गेला, सोयाबीनचेही नुकसान उत्पादनात झाली मोठे नुकसान झाले आहे
यंदाचा संपूर्ण खरीप हंगाम अतिवृष्टी सलग पाऊस अवकाळी पाऊस शेतकऱ्यांसाठी संकट घेऊन आला.विशेषत जामनेर तालुक्यातील कापूस आणि मका पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, कापूस पिकाची दुसऱ्याच वेच्यातच उलंगवाडी होण्याची वेळ आली आहे,गेल्या काही आठवड्यांपासून कापसाची फुले गळणे, शबोंडे सडणे,फुटलेल्या कापसात ओल शिरून ते जमिनीवर पडणे असे विदारक चित्र दिसत आहे,त्यामुळे उत्पादनात मोठ्या प्रमाणावर घट बेगार असून शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे.
विम्याचे दावे निकाली काढा
रब्बी पेरणीसाठी पैसा नसल्याने सावकारांकडून कर्ज घेतले, अनेकांनी सोने तारण ठेवून बियाणे व खते खरेदी केले,गहू, हरभरा,ज्वारीची पेरणी पूर्ण झाली, पण खर्चा भार वाढलेला आहे,कापूस मक्याचे नुकसानीमुळे शेतकरी आर्थिक संकटात आहे,प्रशासनाने तातडीने नुकसानभरपाई जाहीर करावी तसेच पीक विमा दावे जलद निकाली काढण्यासाठी शेतकन्यांची मागणी आहे,
आहे,
मका पिकाचेही चित्र काही वेगळे नाही, काढण्यासाठी खर्च प्रति एकर तीन हजार रुपयांपर्यंत पोहोचत असताना बाजारात दर फक्त दीड हजार, १२५० ते १४५० भाव असल्याने शेतकरी सरळ तोट्यात गेला आहे. पावसाच्या तडाख्यामुळे अनेकांचे मक्यामधील दाणे पूर्णपणे खराब झाले आहे.
या दरम्यान,कापूस वेचणीसाठी मजूरही उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीमध्ये आणखी भर पडली, त्यातच रोही आणि डुक्कर यांसारख्या रानटी प्राण्यांनी पिकाचे नुकसान करीत आहे,
अनेकांनी उचलले कर्ज
शेतक-यांनी रब्बी हंगामाची तयारी केली,मात्र बियाणे, रासायनिक खते आणि इतर साहित्य खरेदी करण्यासाठी पैसा नसल्याने अनेकांना सावकारांकडून कर्ज घ्यावे लागते,तर काहींनी सोने गहाण ठेवून खर्च भागवावा लागला, गहू, हरभरा, ज्वारी आदी रब्बी पिकांची पेरणी पूर्ण झाली असली तरी खरे आव्हान आता पुढील खर्चाची आणि उत्पादन किती मिळणार याचे आहे.
कापसाचे मोठ्या प्रमाणात झालेले नुकसान, मक्याचे घसरलेले उत्पादन आणि वाढता खर्चा यामुळे शेतकरी आर्थिक दुष्परिणामांच्या भोवन्नात सापडल्यासारखी स्थिती आहे, या पार्श्वभूमीवर सर्वेक्षण करुन भरपाई जाहीर करावी,अशी मागणी शेतकरी करीत आहेत.


Post a Comment
0 Comments