Type Here to Get Search Results !

वाकडी येथे गोपीनाथजी मुंडे यांची जयंती साजरी.



 दिशा लाईव्ह न्यूज -:-  वाकडी.ता.जामनेर. येथे सालाबादप्रमाणे वंजारी समाजाचे असलेले दैवत व केंद्रीय ग्राम विकास मंत्री लोकनेते दिवंगत गोपीनाथजी मुंडे साहेब यांची 76 वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

 जयंती कार्यक्रमाचे ठिकाण येथील असलेले कालिंका माता मंदिर परिसरामध्ये आयोजित करण्यात आले. 

यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेले माजी सरपंच तंटामुक्ती अध्यक्ष अशोक पाटील, स्वस्त धान्य दुकान सेक्रेटरी मनोहर घुगे, माजीपोलीस पाटील सदाशिव ढाकणे यांच्या हस्ते प्रथम मुंडे साहेब व संत भगवान बाबा यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण करण्यात आले.

 यावेळी उपस्थित मान्यवर यामध्ये विकास सोसायटी संचालक अनिल गायकवाड ,पोलीस पाटील घनश्याम पाटील, सामाजिक कार्यकर्ते प्रवीण गायकवाड, गौरव राजपूत, संजय दांडगे ,संत सुपडूगीर ,बाबा वारकरी संस्थेचे संचालक ह भ प रोहिदास महाराज, सुनील घुगे, नवल काळे, पैलवान सुभाष राजपूत ,भगवान सेना अध्यक्ष गोपाल घुगे ,



यावेळी कार्यक्रमाप्रसंगी रोहिदास महाराज प्रवीण गायकवाड व कार्यक्रमाचे अध्यक्ष यांनी मुंडे साहेब यांनी केलेले समाजकार्य व त्यांच्या राजकीय प्रवासाबाबत व सर्व समाज बांधवांविषयी असलेली आपुलकी त्यांचे प्रेमळ व्यक्तिमत्व कणखर नेतृत्व लढवय्या लोकनेता व त्यांच्या जीवन चरित्रावरअशा विविध केलेल्या कार्यावरती प्रकाश टाकून मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.

 यावेळी कार्यक्रमाला बहुसंख्य समाज बांधव भगवान सेनेचे उपाध्यक्ष सदस्य व सर्वपक्षीय कार्यकर्ते व समाज बांधव उपस्थित होते. यामध्ये शिवदास घुगे ,ज्ञानेश्वर खडसे, विनोद देशमुख ,राहुल ढाकणे गजानन देशमुख ,नितीन आंधळे, भूषण घुगे, निखिल पाटील, विशाल पाटील ,गोपाल वाघ, तेजस घुगे, अनिकेत व्यवहारे, ईश्वर धुमाळ, हर्षल पाटील ,शरद वाय भासे विनोद आंधळे कृष्णा घुगे ,योगेश देशमुख ,बाळू वाघ, सामाजिक कार्यकर्ते युवराज बिजागरे,विशाल घुगे, हर्षल आंधळे ,लखन राजपूत, शुभम बावणे, सतीश राजपूत, वैभव वाघ ,मतदान के सोहन ढाकणे छोटू आंधळे, राहुल घुगे, महाराज अतुल घुगे ,सर्वांनी उपस्थिती देऊन प्रतिमा पूजन करून साहेबांना अभिवादन केले व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्ञानेश्वर घुगे यांनी केले व उपस्थितांचे आभार सुनील घुगे यांनी मानले.

Post a Comment

0 Comments