पुणे प्रतिनिधी/ शकील मनियार.
दिशा लाईव्ह न्यूज --::---कलाकार हा फक्त कलाकार नसतो. तर तो प्रेरणाकार असतो". 'वास्तव जगाचे प्रतिबिंब आपल्या कलाकृतीतून साकारण्याचे काम तो आयुष्यभर करतो.' समाजाचा तो आरसा असून सामाजिक विचार ,भावना आणि वास्तव्याचे निरीक्षण करून आपल्या कलाकृतीतून तो सादर करतो.
"विचार आणि भावनांना आकार देणारा व्यक्ती म्हणजे कलाकार ",
'जोपर्यंत शारीरिक क्षमता आहे .तोपर्यंत कलाकार हा आपल्या कलेचे सादरीकरण रंगमंचावर करतो. तो निवृत्तीनाथांची भूमिका करू शकतो. परंतु निवृत्त होत नाही.
तमाशा कलावंत किंवा तमाशा फडमालक यानी वयपरत्वे तमाशा क्षेत्रातील सेवानिवृत्ती स्विकारावी का? यावरती अनेक विचारप्रवाह आहेत.याविषयी मला वाटते"सेवानिवृत्ती ही कर्मचाऱ्याला असते.. मालकाला नसते" असे माझे मत आहे.
तमाशा कलेचे जगणे उदरनिर्वाहासाठी की, कलेचा आनंद घेण्यासाठी या दोन बाजू आहेत. काही कलावंत हे वयोवृद्ध जरी झाले. तरी त्यांच्या अंगातील असणारे कलागुण झोपत नाहीत. थंड होत नाहीत. नवीन तारुण्यासारखे ते उरमी धरतात. अनुभवाने कल्पनाशक्ती आणि प्रतिभा ही प्राप्त होते. ती सतत प्रेरणा देत राहते. "प्रत्येक माणसाचं जगण्याचं एक क्षेत्र असतं"!
त्या क्षेत्रात शिवाय त्यांच्या जगण्याला अर्थ प्राप्त होत नाही. काही
कलाकांरावर कुटुंब अवलंबून असते. त्यावेळी त्या माणसाला ती कला उपजिविकेचे साधन वाटते.त्या कलेवर उपजविका होते.त्याच्या कलेतून मानवी संस्कृती अबाधित ठेवण्याचे काम तो करतो
काही कलाकारांना घरात मानसन्मान नसेल. अथवा घरातील अनेक समस्यांना तोंड देणे शक्य नसल्याने हे. तर
ते क्षेत्र जगण्याचे आणि जीवन मौजमजे जगूण घेण्यातच आयुष्य खर्ची करणे अशी मानसिकता होते. त्यासाठी हे क्षेत्र निवडतात. "यावेळी तो कलाकार कला म्हणजे आत्म्याचा विकास असा विचार करत असतो"
प्रश्न असा आहे की,ती कला जोपासताना तो त्या कलेचा वापर उपयोग कोणत्या पद्धतीने करतो. साधारणपणे या तमाशा लोककलेचा विचार जरी केला गेला तर, ६०ते७० च्या वयात असलेले तमाशा फड मालक ही त्यांच्या नावाचा तमाशा फड आहे. म्हणून फक्त एखादी इंट्री ,एखादे गाणे किंवा सत्कारासाठी येतात. बाकी ते सर्व व्यवस्थापक त्यांनी त्यांच्या इतर माणसांकडे दिलेला असते.
त्यामुळे त्यांनी घरी थांबण्यापेक्षा आणि घरी बसून ही काळजी करण्यापेक्षा त्यांच्या अनुभवाचा फायदा हा खरं तर इतर मालकांना किंवा इतर व्यवस्थापनांना होऊ शकतो. म्हणून ती माणसं फक्त त्यांच्या बरोबरीने थांबतात. तमाशाचे खेळ चालू असताना अनेक वेळा गावागावात अनेक समस्या निर्माण होतात. त्यावेळी स्वतः फड मालक किंवा नावाजलेला एखादा कलावंत पटकन रंगमंचावरती गेला .तर तो गोंधळ किंवा ती गडबड थांबू शकते. क्षणात शांतता निर्माण होते. अशा अनेक समस्या त्यांच्या असण्याने दूर होतात . कलाकारांना बळ मिळते. संरक्षण मिळते.
"कलाकार हा परंपरेचा वाहक आहे.' तो समाजाची ओळख व मूल्य एका पिढीकडून दुसऱ्या पिढीला पोहचवतो सेवानिवृत्ती कर्मचाऱ्यांना असते. मालकाला नसते. कलाकार हे स्वतः मालक आहेत.
सेवानिवृत्ती घेतली पाहिजे. पण ज्यावेळी शारीरिक अपंगत्व येते शारीरिक क्षमता नसते. त्यावेळी त्यावेळी आपोआप सेवानिवृत्त होतातच. त्यासाठी वयाचा आणि या कलेचा काही संबंध नाही.
क
जेव्हा एखाद्य्या फड मालकाच्या समोर गावकरी समोरासमोर येतात . गावाच्या यात्रेसाठी तमाशा पाहिजे.त्यावेळी त्या फड मालकाकडे बघून तमाशाची सुपारीत ही आदिकची वाढ जाते. कलाकाराचे ते क्षेत्र आवडीचे , आनंद देणार, नावलौकिकाचे असल्याने त्याला त्याच क्षेत्रातला आनंद जास्त मिळतो.तो घरी राहून किंवा बंगल्यात राहून त्याला तो आनंद घेता येणार नाही.उलट त्याचं दोन वर्षाचे आयुष्य कमी होईल.
कलाकाराने उभ्या आयुष्यामध्ये बचतीचा मार्ग स्वीकारला गेला पाहिजे. परंतु घर, मुले, संसार ,शिक्षण, आरोग्य, धार्मिकविधी या सगळ्या गोष्टीचा विचार करून आज नोकरदार, शेतकरी, व्यवसायिक ,व्यक्ती जरी असली. तरी सर्वच लोकांची बचत होईल असं वाटत नाही. मग कलाकाराचा पगार तर हा त्या मानाने अगदी जेमतेम असतो. एका कलाकारावर त्याचं संपूर्ण कुटुंब अवलंबून असते. त्याच्या काही आवडीनिवडी असतात.त्याच्या चांगल्या वर्तनातून (दूरदृष्टीने ) जर प्रपंचामध्ये मुलांनी शिक्षण घेतले.
मुले शिकली त्यांना नोकरी , व्यवसायातून आर्थिक आवक चांगली झाली. त्यांचा विचार बदलला .तर ती मुलं स्वतःच आपल्या आई वडिलांना तमाशा फडात तमाशा क्षेत्रात जाऊ देत नाहीत. अलिकडे तमाशा क्षेत्रातील तमाशा कलावलांची अनेक मुले उच्च पदावरती आहेत .
काही सेवानिवृत्त झाली आहेत ती पुण्याई फक्त तमाशाची त्या मुलांना ते वैभव तमाशाने प्राप्त करून दिले आहे.याचे उत्तम उदाहरण मी स्वतः आहे.मी आणि माझा भाऊ नोकरीला लागल्यानंतर आम्ही आमच्या वडिलांना राज्य पुरस्कार प्राप्त हलगी सम्राट केरबा पाटलांना तमाशात जाणे बंद केले होते.
त्यावेळी संगीतरत्न दत्ता महाडिक पुणेकर आमच्या घरी वडिलांना तमाशात घेऊन जाण्यासाठी आले होते.आम्ही त्यांना अण्णा म्हणत असू. मी त्यांना म्हणालो," अण्णा आता यापुढे माझे वडील तमाशात हलगी वाजवण्यासाठी येणार नाहीत. तमाशानेच आमचे कुटुंब आता सुखी केले आहे. माझ्या वडिलांवरती जे काही कर्ज असेल. तर ते कर्ज मी पूर्ण करीन परंतु ते पुन्हा तमाशाला येणार नाही.
त्यावरती अण्णांनी स्मित हास्य केले .व म्हणाले, तमाशा पार्टीत केरबा पाटील ही अशी एकच व्यक्ती आहे. की, त्यांनी कधीच तमाशा फडमलकाकडून आगाऊ रक्कम घेतली नाही. वडिलांच्या उतरत्या वयात चैत्र महिन्यामध्ये राहूट्या लागल्यानंतर सकाळी त्यांना तमाशा पंढरीतील राहुटीत आणून सोडायचे. आणि संध्याकाळी घरी घेऊन जात असे. जर एखादा फडमालक म्हटलां, केरबा पाटलांना आज आमच्याबरोबर पाठवा. तर त्या एक दोन दिवसांसाठी आम्ही पाठवत होतो. त्या दोन दिवसानंतर आमच्या वडिलांचा आनंदी झालेल्या चेहरा पाहण्यासारखा असे त्यामुळे मला असे वाटते की, कलावंत कधीच सेवानिवृत्त होत नसतो.
कलाकार समाजाला आकार देणारा आहे मानवी भावनां आणि कल्पकतेला कलाकृतीचे रूप देणारी व्यक्ती म्हणजे कलाकार अशा महान कलाकाराला सेवानिवृत्ती नाही.


Post a Comment
0 Comments