सुनील लोहार -प्रतिनिधी
दिशा लाईव्ह न्यूज--::---कुऱ्हाड ता.पाचोरा_ संत निरंकारी मंडळ पाचोरा शाखेतर्फे रविवार दिनांक 22 रोजी सकाळी दहा ते तीन या दरम्यान रक्तदान शिबिर पार पडले.
संत निरंकारी मंडळातर्फे धुळे झोन अंतर्गत पाचोरा शाखेत दरवर्षी रक्तदान शिबिराचे आयोजन केले जाते .यावर्षी देखील पाचोरा येथील वरखेडी रोड परिसरातील सत्संग भवनात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जळगाव यांच्यातर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी मंडळातील एकूण 155 महिला व पुरुषांनी रक्तदान केले. सेवा समर्पण भाव या युक्तीला अनुसरून सर्व महिला व पुरुषांनी स्वेच्छेने रक्तदान करून एक सामाजिक बांधिलकी जोपासली.
रक्तदान शिबिराच्या वेळेस जळगाव येथील निरंकारी प्रचारक राजकुमार वाणी, पाचोरा निरंकारी मंडळ शाखेचे संयोजक महेश वाघ , किसनजी वरलाणी,प्रकाश डहाके,तुकाराम तेली, सेवादल शिक्षक नितीन वरलानी,संगीता पगारे,सुरेश राऊत,उज्वला पवार,किरण परदेशी,मुकेश वरलानी,बंडू हटकर,प्रमोद पाटील,गोकुळ परदेशी,अशोक परदेशी आदी महात्मा पुरुषांनी शिबिरास सहकार्य केले.



Post a Comment
0 Comments