Type Here to Get Search Results !

मेणगाव, ता.जामनेर येथे अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह--अखंडितपणे 238 वर्षांपासून चालत आलेली भक्तिमय परंपरा.



दिशा लाईव्ह न्यूज--::--जामनेर तालुक्यातील मेणगाव नावाच्या एका छोट्याशा गावाची 238 वर्षापासून चालत आलेली अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह ची परंपरा जोपासत आजही तितक्याच उत्साहात गावकरी सप्ताहाची परंपरा पुढे नेत आहेत.

हा वारसा खूप जुना वारसा ह्या गावाला लाभलेला असून इथले वातावरण अतिशय भक्तिमय आहे. ह्या वर्षी संगीतमय भागवत कथा वक्ते ह. भ. प. श्री गणेश महाराज धुमाळ यांच्या मधाळ वाणीतून गावकरी श्रवण करीत आहे.



श्री विठ्ठल रुक्माई मंदिर येथे हा सप्ताह निरंतर आयोजित केला जातो प्रारंभ दि.12/03/2026 रोजी सुरू झालेला असून.19/03/2026 रोजी समाप्ती आहे..

 सदर कार्यक्रमासाठी गावातील सर्व ग्रामस्थ अहोरात्र परिश्रम घेत आहे.

तरी सर्वांनी उपस्थिती लावावी.. तुमची उपस्थिती अनमोल राहील.. ठिकाण; श्री विठ्ठल रुक्माई मंदिर मेनगाव. ता. जामनेर जि. जळगाव.  

Post a Comment

0 Comments