सोयगाव / प्रतिनिधी : दत्तात्रय काटोले
दिशा लाईव्ह न्यूज--::---सोयगाव येथे खान्देश किंग म्हणून ओळख असलेले सचिनभाऊ कुमावत यांच्या आगमनाने उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. फर्दापूर येथील न्यू सुरूची हॉस्टेलचे संचालक राजूभाऊ शेठ बागले यांच्या कन्या चि.सौ.का. नेहा हिच्या विवाह सोहळ्यानिमित्त सचिनभाऊ कुमावत सोयगाव येथे उपस्थित होते.
यावेळी राजूशेठ बागले, कृष्णा राऊत, योगेश राऊत, कृषीभूषण अरुण सोहणी, समस्त बागले परिवार तसेच जय भोले मित्र मंडळ नारळीबाग व मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तसेच राऊत, शेजूळ परिवार आणि समस्त तेली समाजाच्या वतीने सचिनभाऊ कुमावत यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन भव्य सत्कार करण्यात आला.
सचिनभाऊ यांच्या आगमनाची माहिती मिळताच परिसरातील त्यांच्या चाहत्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्साहात स्वागत केले. विशेषतः लहान मुले व तरुणांमध्ये त्यांना पाहण्यासाठी मोठी उत्सुकता दिसून आली. विवाह सोहळ्याच्या निमित्ताने झालेल्या या स्वागतामुळे कार्यक्रमात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
वधू-वरांस आशीर्वाद :
या मंगल प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी नवदांपत्यास शुभेच्छा देत त्यांच्या वैवाहिक जीवनासाठी सुख, समृद्धी, उत्तम आरोग्य व यशस्वी भवितव्याच्या शुभेच्छा दिल्या.


Post a Comment
0 Comments