दिशा लाईव्ह न्यूज--::---- पहूर पेठ येथील जिल्हा परिषद मराठी शाळा संतोषीमातानगर शाळेत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त ग्रेडेड मुख्याध्यापक पी.टी.पाटील (शांतीसुत) हे होते. प्रमुख अतिथी म्हणून पहूर केंद्राचे केंद्रप्रमुख भानुदास तायडे हे उपस्थित होते.
सुरूवातीला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला व प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
यावेळी कौस्तुभ थोरात, श्रीनिवास जाधव, रोहिणी दुतकर, निलेश कुमावत, शौर्य जाधव, रिया कुमावत, मोहित घोंगडे, वेदांत बेलदार, सोहम सोनवणे, संचित रिठे या विद्यार्थांनी तसेच श्रीमती मनीषा राऊत, मुख्याध्यापिका श्रीमती चित्रलेखा राजपूत यांची भाषणे झाली. सेवानिवृत्त ग्रेडेड मुख्याध्यापक पी.टी.पाटील (शांतीसुत) यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी "ज्ञानदीप बाबासाहेब" हि कविता सादर केली. तसेच विद्यार्थांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापिका श्रीमती चित्रलेखा राजपूत यांनी केले व आभार श्रीमती मनीषा राऊत यांनी मानले. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्रीमती निकिता तगरे, साधना सर्जेराव तसेच विद्यार्थांनी परिश्रम घेतले.

Post a Comment
0 Comments