पहूर प्रतिनिधी-ता.जामनेर
दिशा लाईव्ह न्यूज-:--:- जामनेर तालुक्यातील माळप्रिंपी येथे वीजतारांच्या शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत शेतातील असलेले मक्याचे पीक जळून खाक झाल्याची घटना घडली आहे.
शेतकरी सुरेश शेनफडू पाटील यांच्या तीन एकर क्षेत्रातील मका पीक तसेच शेतातील ठिंबक संच हे आगीत पूर्णपणे जळून गेले आहे. त्यामुळे त्यांचे जवळपास तीन लाख रुपये चे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
प्रशासनाने सदरील नुकसानीचा पंचनामा करून आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी शेतकरी सुरेश शेनफडू पाटील यांनी व्यक्त केली आहे.
माळप्रिंपी येथील शेतकरी सुरेश पाटील यांनी त्यांच्या तीन एकर शेतात मक्याची लागवड केली होती. चार महिन्यांची मेहनत करून पीक ऐन काढणीला आले होते. विद्युततारांच्या घर्षणामुळे स्पार्किंग होऊन मक्याला आग लागली.सदरील शेतकरी हे घरी असल्याने बाजूच्या शेतकऱ्यांनी ही आग विझविण्याचा प्रयत्न केला. भर उन्हात आग वेगाने पसरत होती. स्थानिक शेतकरी व ग्रामस्थांनी धाव घेत मोठ्या प्रयत्नांनी आग विझवली प्रयत्न केला मात्र, तोपर्यंत मका जळून खाक झाला होता.
या जळालेल्या क्षेत्रातून अंदाजे १५० क्विंटल मका उत्पादन झाले असते. सध्या बाजारात मक्याला सुमारे १७०० रुपये प्रति क्विंटल दर मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्याचे सुमारे ३ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. सुरेश पाटील यांनी शासनाकडे तातडीने पंचनामा करून नुकसानभरपाई देण्याची मागणी केली आहे.
आधीच अवकाळी पाऊसमध्ये शेतातील कपाशीचे पिक वाहून गेले होते. त्यामुळे वाढत्या खर्चामुळे अडचणीत असताना ही आग लागली आहे. त्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, प्रशासनाने तत्काळ घटनास्थळी पाहणी करून पंचनामा करावा. नुकसानग्रस्त शेतकऱ्यास लवकरात लवकर आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी होत आहे.
**********************************************
प्रतिक्रिया-:-
चार महिन्याची मेहनत एका क्षणात खाक मागील चार महिने मेहनत करून मी खूप कष्टाने हे मक्याचे पीक उभं केलं होते.पेरणीपासून ते आजपर्यंत सतत मेहनत घेतली, पण काही क्षणांत सगळं जळून खाक झालं. आधीच अवकाळी पावसामुळे नुकसान झालं होतं, त्यात ही आग लागून संपूर्ण हंगामच संपला आहे. शॉर्टसर्किट मुळे लागलेल्या या आगीत मोठे नूकसान झाले. शासनाने तत्काळ पंचनामा करून मला योग्य ती नुकसान भरपाई द्यावी.
सुरेश शेनफडू पाटील शेतकरी,माळप्रिंपी



Post a Comment
0 Comments