पहूर प्रतिनिधी---(ता. जामनेर) :
दिशा लाईव्ह न्यूज ---:::-----सनातन हिंदू धर्मातील प्रमुख संतांविषयी करण्यात आलेल्या आक्षेपार्ह व चुकीच्या वक्तव्यामुळे संत समाजाच्या भावना तीव्र दुखावल्या गेल्या असून, या प्रकाराचा सर्वत्र संतप्त निषेध व्यक्त होत आहे.
या पार्श्वभूमीवर संत समाज एकत्र येत पहूर येथील श्रीक्षेत्र संगमेश्वर महादेव मंदिर ट्रस्ट व भक्त परिवाराच्या वतीने संबंधितांविरोधात पोलीस प्रशासनाकडे लेखी निवेदन सादर करण्यात आले.
वारकरी संप्रदाय व हिंदू समाज हा ‘वसुधैव कुटुंबकम’ व विश्वबंधुत्वाच्या उदात्त विचारांचा पुरस्कार करणारा आहे. संत ज्ञानेश्वर माऊलींनी ‘पसायदान’मधून संपूर्ण विश्वाच्या कल्याणाची प्रार्थना केली आहे. महाराष्ट्र ही संत, महंत व समाजसुधारकांची पवित्र भूमी असून कीर्तनकार व प्रबोधनकारांनी आपल्या कीर्तन-प्रवचनातून समाजाला सन्मार्गावर नेण्याचे महान कार्य केले आहे.
अशा संतांविषयी अपशब्द वापरणे व आक्षेपार्ह वक्तव्य करणे अत्यंत निषेधार्ह असल्याचे ट्रस्टच्या वतीने नमूद करण्यात आले असून संबंधित व्यक्तींवर तात्काळ व कठोर कारवाई करावी, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, शेंदुर्णी येथे सकल हिंदू समाजाच्या वतीने आयोजित आंदोलनात श्रीक्षेत्र संगमेश्वर महादेव मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष तथा पुजारी शिवभक्त रंगनाथ महाराज व विश्वस्त किशोर बनकर यांनी सहभाग नोंदवून पोलीस प्रशासनास निवेदन सादर केले.
यावेळी ह.भ.प. परमेश्वर महाराज यांनी प्रखर शब्दांत या प्रवृत्तीचा धिक्कार केला. शेंदुर्णी व परिसरातील हिंदू बांधव मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते.


Post a Comment
0 Comments