दिशा लाईव्ह न्युज--::--दि. 20 : राज्य पोलीस दलात महत्त्वाचे प्रशासकीय फेरबदल करण्यात आले असून जळगाव जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकपदी श्रीकांत ढीवरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी ते धुळे येथे पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत होते.
जळगावचे विद्यमान पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांची बदली पुणे येथील राज्य गुन्हे अन्वेषण विभाग (CID) येथे करण्यात आली आहे. त्यांच्या कार्यकाळात जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी विविध प्रभावी उपाययोजना राबविण्यात आल्या होत्या.
दरम्यान, पुणे येथील पोलीस उपआयुक्त राजकुमार शिंदे यांची वाशिम जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यभरात करण्यात आलेल्या या बदल्यांमुळे पोलीस प्रशासन अधिक गतिमान व सक्षम करण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचे बोलले जात आहे.
नवीन पोलीस अधीक्षक म्हणून श्रीकांत ढीवरे यांच्याकडून जळगाव जिल्ह्यात गुन्हेगारीवर प्रभावी नियंत्रण आणत नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी ठोस पावले उचलली जातील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Post a Comment
0 Comments