दिशा लाईव्ह न्यूज-:- (सौ गीता भामेरे )पहूर ता जामनेर
राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री ना. गिरीश महाजन यांच्या विशेष संकल्पनेतून आणि मार्गदर्शनाखाली जामनेर तालुक्यातील मोतीबिंदूग्रस्त रुग्णांसाठी मोफत शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले. जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात पार पडलेल्या या उपक्रमात ३८ रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया करून त्यांना दृष्टीदान देण्यात आले.
या मोहिमेअंतर्गत जामनेर शहर, फत्तेपूर, पाचोरा, धामणगाव आणि परिसरातील गरजू नागरिकांनी मोठ्या संख्येने लाभ घेतला. ग्रामीण भागातील रुग्णांना अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा मोफत उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला होता. या संपूर्ण मोहिमेचे नियोजन आणि अंमलबजावणी करण्यासाठी मंत्री गिरीश महाजन वैद्यकीय सहायता कक्षाचे समन्वयक आरोग्यदूत शिवाजी पाटील यांनी विशेष पुढाकार घेतला. रुग्णांची तपासणी, त्यांना जळगाव येथे आणणे आणि शस्त्रक्रियेनंतरची सुश्रुषा यासाठी त्यांनी चोख व्यवस्था केली होती.
शस्त्रक्रिया यशस्वी करण्यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाने अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकुर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. स्वप्नील सांगोळे डॉ. धर्मेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली परिश्रम घेतले. यामध्ये डॉ. प्रवीण पाटील, डॉ. मयुरी राठोड, डॉ. श्वेता चोपडे, डॉ. राधिका बरक, डॉ. विरम राजपूत, डॉ. सोबिया अन्सारी, डॉ. मयुरेश डोंगरे, डॉ. स्वाती आसोले, डॉ. भारती वाणी, डॉ. वृंदा कुंभारे आणि डॉ. पूजा पाठक, सहाय्यक कर्मचारी: सुनीता वक्ते, भाग्यश्री ढाकणे, वैष्णवी दांडगे, मयुरी हिवराळे आणि उमेश पाटील यांनी तांत्रिक व प्रशासकीय सहकार्य केले. या यशस्वी शस्त्रक्रियेबद्दल लाभार्थ्यांनी मंत्री गिरीश महाजन आणि संपूर्ण वैद्यकीय पथकाचे आभार मानले आहेत.
"गरिबांना वेळेवर आणि मोफत उपचार मिळावेत हाच आमचा मानस आहे. या शस्त्रक्रियेमुळे ३८ नागरिकांच्या जीवनातील अंधार दूर झाला असून, हा उपक्रम असाच सुरू राहील," अशी भावना आयोजकांतर्फे व्यक्त करण्यात आली आहे.


Post a Comment
0 Comments