पहूर, प्रतिनिधी-ता. जामनेर :
दिशा लाईव्ह न्यूज --::--जामनेर तालुक्यातील पहूर पेठ, सांगवी व खर्चाणे ग्रुप ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीत मंगळवारी (ता. २८) उत्साहपूर्ण मतदान पार पडले. उन्हाची तीव्रता असतानाही मतदारांनी मोठ्या संख्येने मतदान करून लोकशाहीप्रती आपली बांधिलकी दाखवली. एकूण ७३. ५२टक्के मतदान नोंदविण्यात आले.
प्रभाग क्रमांक २ चे सदस्य तथा माजी उपसरपंच राजू पाटील यांनी राजीनामा दिल्याने ही जागा रिक्त झाली होती. या जागेसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडली. एकूण १९४९ मतदारांपैकी १४३३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
या निवडणुकीत ललित मदनलाल लोढा, सुकलाल बळीराम बारी आणि विनोद रामचंद्र पाटील या तीन उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले असून, निकाल बुधवारी जाहीर होणार आहे. निकालाची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे .
निवडणुकीदरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पहूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद कठोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

Post a Comment
0 Comments