काशिनाथ आल्हाट -:-जुन्नर तालुका प्रतिनिधी.
दिशा लाईव्ह न्यूज--::---चैत्र महिना म्हटलं की ,जत्रायात्रांचा हंगाम सुरू होतो. गावची यात्रा तमाशा शिवाय ही समृद्ध होत नाही".
चैत्र महिन्यात नारायणगाव येथे राष्ट्रपती पारितोषिक विजेत्या तमाशा सम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर तमाशा पंढरीत प्रत्येक वर्षी 35 ते 40 तमाशा फडांची कार्यालये स्थापन होतात .या कार्यालयात महाराष्ट्रातील अनेक गावात यात्रेच्या निमित्ताने तमाशा कार्यक्रमाचे बुकिंग केले जाते.
दोन दिवसापूर्वी राष्ट्रपती पारितोषिक विजेत्या तमाशा सम्राज्ञी विठाबाई भाऊ नारायणगावकर यांच्या तमाशा फडाच्या गाड्यातील कलावंतांवर घारगावच्या वरुडी पठार तालुका संगमनेर या गावच्या काही तरुणांनी हल्ला केला.
त्यामध्ये महिलांचा विनयभंग करून कलावंतांना मारहाण केली. तसेच त्यांच्या गळ्यातील चैन ,आणि रोख रक्कम लंपास केली.
यासंदर्भात घारगाव पोलीस स्टेशन येथे पोलीस तक्रार दाखल करण्यात आली आहे.
"खरं तर! महाराष्ट्रातील लोक कलावंत ही महाराष्ट्राची लोकसंस्कृती जपण्याचे काम करतात".आपले दुःख, आपल्या संसारातील दुःख हे पदराआड करून यात्रेच्या निमित्ताने तमाशा रसिकांच्या चेहऱ्यावरच्या हसू निर्माण करण्याचे काम करतात .गावची यात्रा समृद्ध करतात.
'नव्हे नव्हे तरी यात्रा तमाशामुळे मोठ्या उत्साहात साजरी होते '
'तमाशा हे उत्तम प्रबोधन आणि मनोरंजनाचे साधन आजही मोठ्या प्रमाणात आपणांस माहित आहे'. महाराष्ट्राची लोकसंस्कृती जपणाऱ्या अशा लोककलावंतांचा आदर करण्याऐवजी काही नत भ्रष्ट झालेले तरुण , विकृत विचाराने मदधुंद झालेले तरुण या कलाकारांचा सन्मान न करता त्यांना अपमानित करतात
अशा या नराधमांना कडक शिक्षा झाली पाहिजे .पुन्हा अशा विकृत घटना महाराष्ट्रात होणार नाही . याची दखल शासनाने घेतली पाहिजे.
यासाठी तमाशा पंढरीत या घटनेचा तीव्रप्रसाद उमटला. तमाशा पंढरीत सर्व फडमालक,
व्यवस्थापक,
कर्मचारी, ग्रामस्थ, तमाशा रसिक यांचै वतीने निषेध जाहीर व्यक्त करण्यात आला .
या निमित्ताने राष्ट्रपती पारितोषिक विजेत्या विठाबाई भाऊ नारायणगावकर,या तमाशा फडाचे संचालक मोहित नारायणगावकर, ज्येष्ठ व्यवस्थापक अशोक काटे, द युवा पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा अध्यक्ष काशिनाथ आल्हाट , नारायणगाव यात्रा कमिटीचे सदस्य रामभाऊदादा शेवाळे, चंद्रकांत ढवळपुरीकर तमाशा फडाचे मालक संतोष ढवळपुरीकर, दिपाली सुरेखा तमाशा फडाचे संचालक शशि सोनवणे, व्यवस्थापक जयवंत गायकवाड, तमाशा रसिक रघुनाथ पवार,महेश आंबटकर,अशोक शिंदे, स्वप्नील माळवे,रवी कुटेआदि मान्यवर उपस्थित होते.
या घटनेतील आरोपी सुमित शांताराम गुंजाळ ,संकेत शांताराम बांगर ,सोमेश सुखदेव बोंबले, दत्तात्रय रावसाहेब पडवळ सर्व राहणार वरुडी पठार यांना कडक शिक्षा झाली नाही. तर जुन्नर, आंबेगाव, खेड तालुक्यातील सर्व लोककलावंतांच्यावतीने भव्य आंदोलन केले जाईल.असा इशारा द युवा ग्रामीण पत्रकार संघाचे पुणे जिल्हा अध्यक्ष काशिनाथ यांनी इशारा दिला आहे.


Post a Comment
0 Comments