Type Here to Get Search Results !

पंढरपूरात राज्यस्तरीय पुरस्कारांचा जल्लोष; प्रसिद्ध निवेदिका ऐश्वर्या चासकर यांचा दिमाखदार सन्मान! विविध क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव – भगवंत पांडुरंगाच्या साक्षीने सोहळ्याला उत्साहाची उधाण


पुणे प्रतिनिधी/शकील मनियार 

दिशा लाईव्ह न्यूज--::--सांस्कृतिक, सामाजिक आणि पत्रकारितेच्या क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत ३१ मार्च २०२६ रोजी पंढरपूर येथे “राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा २०२६” मोठ्या उत्साहात आणि दिमाखात पार पडला. द युवा ग्रामीण पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आयोजित या भव्य सोहळ्यात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना प्रतिष्ठित पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.


या सोहळ्याचे खास आकर्षण ठरल्या त्या प्रसिद्ध निवेदिका ऐश्वर्या चासकर! आपल्या ओघवत्या, प्रभावी आणि हृदयस्पर्शी निवेदन शैलीने महाराष्ट्रभर प्रेक्षकांच्या मनात घर करणाऱ्या ऐश्वर्या चासकर यांना या मंचावर सन्मानित करण्यात आले. त्यांच्या आवाजातील जादू, मंचावरील आत्मविश्वास आणि प्रत्येक कार्यक्रमाला उंची देण्याची कला यामुळे त्या आजच्या तरुण पिढीसाठी प्रेरणास्थान ठरत आहेत. त्यांच्या सन्मानावेळी उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट करत त्यांना भरभरून दाद दिली.


या सोहळ्यात महाराष्ट्र समाज भूषण, आदर्श पत्रकार, आदर्श शिक्षक, सेवा धन्वंतरी भूषण, कृषी भूषण, कलारत्न भूषण, गानसम्राज्ञी, साहित्यभूषण, अभियंता भूषण, भारत भूषण, आदर्श माता, शौर्य पुरस्कार, पर्यावरण पुरस्कार, साहित्यरत्न, काव्य भूषण, आदर्श लेखक, वृक्षमित्र, आरोग्यदूत, क्रीडारत्न, नारिशक्ती, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, महाराष्ट्र रत्न, जीवन गौरव, उत्कृष्ट सरपंच, आदर्श शेतकरी, संत तुकाराम महाराज जीवन गौरव पुरस्कार, महात्मा ज्योतिबा फुले पुरस्कार, यांसारख्या अनेक मानाच्या पुरस्कारांनी विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान व्यक्तींचा गौरव करण्यात आला.


सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, अध्यात्मिक,साहित्यिक, सांस्कृतिक, कला, क्रीडा, कृषी वैद्यकीय, पत्रकारिता, पोलिस सेवा तसेच देशसेवेसाठी योगदान देणारे सैनिक, युवा वर्ग आणि शौर्य दाखवणाऱ्या बालकांनाही या सोहळ्यात राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

कार्यक्रमाचे आयोजन संतराज पॅलेस, विसावा मंदिराशेजारी, बुलेट शोरूम समोर, पुणे रोड, पंढरपूर येथे करण्यात आले होते. भगवंत पांडुरंगाच्या पवित्र भूमीत झालेल्या या सोहळ्यामुळे कार्यक्रमाला एक वेगळीच आध्यात्मिक उंची लाभली. उपस्थितांना पांडुरंगाच्या दर्शनाचा लाभ घेता आला तसेच कार्यक्रमानंतर स्वादिष्ट भोजनाचीही उत्तम व्यवस्था करण्यात आली होती.



        या प्रसंगी श्री संत शिरोमणी सावता महाराजांचे 19 वे वंशज सावता महाराज वसेकर,  पंढरपूरच्या नगराध्यक्ष प्रणिती भालके, वनरक्षक अधिकारी अनिता शिंदे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष ॲड. प्रणव परिचारक, द युवा ग्रामीण पत्रकार संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अन्सार शेख, ऐकता फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अनंत कराड राष्ट्रीय महिला अध्यक्षा कल्पना पवार, राज्याध्यक्ष शकील मनियार, सचिव बाळासाहेब कोठुळे, महिला सचिव मंगलताई सासवडे, महाराष्ट्राची भूमी मुख्य संपादक आनंद बारवकर, सोलापूर जिल्हा कार्यकारणी, पुणे जिल्हा कार्यकारणी, सांगली जिल्हा कार्यकारिणी,द युवा पत्रकार संघ जळगांव जिल्हाध्यक्ष तथा दिशा लाईव्ह न्यूजचे संपादक दिनेश चौधरी, संपूर्ण जळगाव जिल्हा कार्यकारिणी आणि पदाधिकारी यांच्यासह अनेक मान्यवर व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


हा सोहळा केवळ पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम नसून, समाजातील कर्तृत्वाला सलाम करणारा, प्रेरणा देणारा आणि नवचैतन्य निर्माण करणारा ठरला. विशेषतः ऐश्वर्या चासकर यांच्या निवेदनामुळे  कार्यक्रमाला एक ग्लॅमर आणि अभिमानाची झळाळी प्राप्त झाली.

Post a Comment

0 Comments