पहुर प्रतिनिधी--::--(ता. जामनेर) –
दिशा लाईव्ह न्यूज --::---सध्या इंधन टंचाईमुळे सर्वसामान्य नागरिक हैराण झाले असताना, काही ठिकाणी या परिस्थितीचा गैरफायदा घेत नागरिकांशी अरेरावी केली जात असल्याचे प्रकार समोर येत आहेत. नेरी–पहुर मार्गावरील ‘खूपचंद सागरमल अँड सन्स’ या पेट्रोल पंपावर घडलेली एक संतापजनक घटना सध्या चर्चेचा विषय ठरली आहे.
गाडीत गंभीर रुग्ण आणि अवघ्या एक वर्षाचे बाळ असतानाही, पंप चालकाने इंधन देण्यास नकार देत तब्बल एक तास बनकर कुटुंबाचा मानसिक छळ केल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी पीडित कुटुंबाने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
नेमका प्रकार काय?
मिळालेल्या माहितीनुसार, पहुर येथील रहिवासी तुषार अशोक बनकर हे आपल्या घरातील आजारी व्यक्तीला उपचारासाठी घेऊन जात होते. त्यांच्यासोबत पत्नी आणि एक वर्षाचे लहान बाळही होते. दरम्यान, नेरीजवळ गाडीचे डिझेल संपल्याने त्यांनी जवळच्या पेट्रोल पंपावर गाडी लावली.
इंधन टंचाईमुळे मोठी रांग असल्याने बनकर यांनी नियम पाळत जवळपास अर्धा तास प्रतीक्षा केली. मात्र, त्यांचा नंबर येताच पंप कर्मचाऱ्यांनी अचानक इंधन देण्यास नकार दिला आणि दुसऱ्या बाजूने पुरवठा सुरू ठेवला.
‘इंधनाला माल’ म्हणत अपमान
याबाबत विचारणा करण्यासाठी तुषार बनकर पंपाच्या कार्यालयात गेले असता, पंप मालक रितेश खूपचंद जैन यांनी अत्यंत उद्धट भाषेत उत्तर दिले.
“तू कोण मला प्रश्न विचारणारा? जा तुला ‘माल’ देत नाही, तुला काय करायचं ते कर!”
जीवनावश्यक इंधनाला ‘माल’ संबोधत ग्राहकाचा अपमान केल्याने संताप व्यक्त होत आहे.
महिला व बाळाचीही दया नाही
दरम्यान, गाडीत असलेले बाळ रडत असल्याने सौ. अश्विनी बनकर यांनी स्वतः खाली उतरून हात जोडून विनंती केली. मात्र, त्यांनाही असभ्य वागणूक देत पंप चालकाने मदत करण्यास नकार दिला.
इतकेच नव्हे तर,
“कलेक्टरनेच इंधन देण्यास मनाई केली आहे”
असा दावा करत जिल्हा प्रशासनाच्या नावाचाही गैरवापर करण्यात आला.
संतापाची लाट; कारवाईची मागणी
या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. इंधन टंचाईच्या काळात नागरिकांना मदत करण्याऐवजी अशी अमानुष वागणूक देणाऱ्या पंप चालकावर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
पीडित कुटुंबाने पोलिसांत तक्रार दाखल केली असून, प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घ्यावी अशी मागणी होत आहे.
इंधनासारख्या अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या व्यावसायिकांकडून संवेदनशीलता अपेक्षित असते. मात्र, नेरी–पहुर येथील या घटनेने मानवतेलाच काळिमा फासला आहे. प्रशासनाने योग्य ती चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणे

Post a Comment
0 Comments