दिशा लाईव्ह न्यूज-:-- -:- : पाचोरा तालुक्यातील लोहारा येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या निवडणुकीत यंदा ऐक्याचे चित्र पाहायला मिळाले. अध्यक्षपदी येथील सामाजिक कार्यकर्ते जयेंद्र पांडुरंग सूर्यवंशी यांची बिनविरोध निवड झाली असून, उपाध्यक्षपदी भगवान यशवंत खरे यांचीही एकमताने निवड करण्यात आली आहे.
गावातील सहकार चळवळ मजबूत करण्याच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे.
सोसायटीच्या अध्यक्षपदासाठी जयेंद्र सूर्यवंशी आणि प्रताप पुरुषोत्तम सूर्यवंशी यांनी अर्ज दाखल केले होते. मात्र प्रताप सूर्यवंशी यांनी माघार घेतल्याने जयेंद्र सूर्यवंशी यांची निवड बिनविरोध झाली. त्यानंतर उपाध्यक्षपदासाठी भगवान खरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.
या निवड प्रक्रियेदरम्यान पॅनल प्रमुखव भाजपचे जेष्ठ नेते शरद सोनार, ज्येष्ठ मार्गदर्शक शिवराम भडके, विकास देशमुख, संस्थेचे संचालक प्रभाकर चौधरी, लक्ष्मण कोळी, सुनील क्षीरसागर, प्रताप पाटील, शकील पठाण यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. तसेच निवडणूक निर्णय अधिकारी महेश कासार आणि सहाय्यक निबंधक कार्यालयाच्या मार्गदर्शनाखाली प्रक्रिया पार पडली.
उपस्थित सदस्यांनी नव्याने निवडून आलेल्या पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करत त्यांच्याकडून पारदर्शक व विकासाभिमुख कारभाराची अपेक्षा व्यक्त केली.
नवीन अध्यक्ष जयेंद्र सूर्यवंशी यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, “सर्व सदस्यांचा विश्वास हीच आमची ताकद आहे. शेतकरी व सभासदांच्या हितासाठी प्रामाणिकपणे काम करून सोसायटीला नवे उंचीवर नेण्याचा प्रयत्न करू.”
उपाध्यक्ष भगवान खरे यांनीही “सहकार्य, पारदर्शकता आणि विकास” या त्रिसूत्रीवर भर देत सर्वांना सोबत घेऊन काम करण्याचे आश्वासन दिले.
गावात शांततेत आणि एकमताने झालेली ही निवडणूक सहकार क्षेत्रासाठी सकारात्मक संकेत मानली जात असून, आगामी काळात लोहारा सोसायटीकडून विकासकामांना गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

Post a Comment
0 Comments