दिशा लाईव्ह न्यूज-:- राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त लोहारा येथे सामाजिक बांधिलकी जपणारा उपक्रम राबविण्यात आला. भारतीय जनता पार्टी, लोहारा यांच्या वतीने तसेच एकता दिव्यांग बहुउद्देशीय संस्थेच्या सहकार्याने दिव्यांग विद्यार्थी व पाल्यांसाठी शालेय साहित्य वाटप आणि गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.
दि. 17 मे 2026 रोजी रविवारी सकाळी 9 वाजता माळी समाज मंगल कार्यालय येथे हा कार्यक्रम उत्साहात पार पडला. ग्रामपंचायत सदस्य व भाजप कार्यकर्ते कैलास चौधरी यांच्या पुढाकारातून इयत्ता पहिली ते बारावीपर्यंत शिक्षण घेत असलेल्या दिव्यांग विद्यार्थ्यांना रजिस्टर-वह्यांचा संच, पेन, पेन्सिल यांसह विविध शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.
याचबरोबर, एकता दिव्यांग बहुउद्देशीय संस्थेतर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही इयत्ता दहावी व बारावी उत्तीर्ण दिव्यांग विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक यशाचे कौतुक करत त्यांना पुढील वाटचालीसाठी प्रेरणा देण्यात आली.
डॉ. जे. जी. पंडित माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक पी. एम. सुर्वे सर यांनी दिव्यांग विद्यार्थ्यांना परीक्षा पॅडचे वाटप करून त्यांना प्रोत्साहन दिले.
कार्यक्रमादरम्यान उपस्थित मान्यवरांनी दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी अशा उपक्रमांची गरज अधोरेखित केली. निवृत्त शिक्षक व सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय भोसांडे गुरुजी, प्रभाकर काळू चौधरी गुरुजी आणि कैलास चौधरी यांनी मार्गदर्शन करत विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या माध्यमातून स्वावलंबी होण्याचे आवाहन केले.
या कार्यक्रमासाठी उपसरपंच दीपक खरे, विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन विकास देशमुख, डॉ. सुभाष घोंगडे, अनिल तडवी, अतुल कोळी, भास्कर भोई, विशाल खाटीक, हसन शेठ, सादिक मन्नान खान, दिलीप चौधरी, विवेक जाधव, सुभाष बाविस्कर, जयेंद्र पाटील, प्रवीण चौधरी, शरद कोळी, श्याम शिंपी, सुनील देशमुख, श्याम पालीवाल, सुनील खरे, विलास काळे सर, मनोज भोसांडे, सुभाष चौधरी यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
तसेच, एकता दिव्यांग बहुउद्देशीय संस्थेचे उपाध्यक्ष सुरेश पाटील, सचिव विजय जाधव, खजिनदार कांतीलाल राजपूत आणि सदस्य विकास शिवदे, बाळू जाधव, अनिल चौधरी, अनिल राजपूत, अहमदखान पठाण यांच्यासह अनेक दिव्यांग सदस्यांनी कार्यक्रमात सहभाग नोंदविला.
कार्यक्रमाच्या शेवटी संस्थेचे उपाध्यक्ष सुरेश पाटील यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले. या उपक्रमामुळे समाजात दिव्यांग विद्यार्थ्यांप्रती संवेदनशीलता वाढीस लागून त्यांच्या शिक्षणाला चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.




Post a Comment
0 Comments