पहूर प्रतिनिधी--:-ता. जामनेर :
दिशा लाईव्ह न्यूज --::---पाळधी परिसरातील शेतशिवारात एक हृदयस्पर्शी घटना घडली असून, ठिबक सिंचनाच्या नळ्यांमध्ये शिंगे अडकलेल्या हरणाला शेतकरी व प्राणीमित्रांच्या तत्परतेमुळे नवजीवन मिळाले. माळप्रिंपी रस्त्यालगत असलेल्या अमजद अब्बास पठाण यांच्या शेतात ही घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, शेतातील ठिबक सिंचनाच्या नळ्यांमध्ये एका हरणाची शिंगे घट्ट अडकली होती. शिंगे गुंतल्यामुळे ते बराच वेळ तडफडत होते व अत्यंत थकलेल्या अवस्थेत होते. या दरम्यान शेजारील शेतकरी निळकंठ शिवदास माळी यांच्या निदर्शनास ही बाब आली. त्यांनी तात्काळ परिस्थितीचे गांभीर्य ओळखून स्थानिक सर्पमित्र व प्राणीमित्र नाना माळी यांच्याशी संपर्क साधला.
माहिती मिळताच नाना माळी यांनी विलंब न करता घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी अत्यंत शांततेने आणि कौशल्याने परिस्थिती हाताळत ठिबकच्या नळ्या काळजीपूर्वक कापण्यास सुरुवात केली. काही वेळाच्या प्रयत्नांनंतर हरणाची सुरक्षित सुटका करण्यात त्यांना यश आले.
सुटका झाल्यानंतर काही क्षण विश्रांती घेत हरणाने पुन्हा जंगलाच्या दिशेने धाव घेतली. या प्रसंगामुळे उपस्थित शेतकरी व नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
घटनेची माहिती तत्काळ जामनेर वनविभागाचे कर्मचारी अशोक ठोंबरे यांनाही देण्यात आली. त्यांनीही वेळोवेळी सहकार्य केल्याबद्दल शेतकरी व प्राणीमित्रांचे कौतुक केले.
या घटनेमुळे माणुसकीची भावना आणि वन्यजीवांबद्दलची संवेदनशीलता पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. शेतकऱ्यांनी व प्राणीमित्रांनी दाखवलेल्या धाडस व तत्परतेमुळे एका मुक्या जीवाला जीवदान मिळाल्याची भावना संपूर्ण परिसरात व्यक्त



Post a Comment
0 Comments