दिशा लाईव्ह न्यूज --::--रावेर लोकसभा मतदारसंघातील (जामनेर, भुसावल, चोपडा-यावल विधानसभा) युवासेना संघटनात्मक बांधणीला बळकटी देण्यासाठी विश्वजितराजे मनोहर पाटील यांची युवासेना जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती शिवसेना मुख्यनेते तथा उपमुख्यमंत्री ना. एकनाथराव शिंदे यांच्या आदेशाने करण्यात आली असून शिवसेना संसदीय नेते तथा संसदरत्न खासदार श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ही प्रक्रिया पार पडली.
युवासेना कार्याध्यक्ष भाईसाहेब पुर्वेश सरनाईक, मुख्य सचिव राहुल लोंढे तसेच सचिव किरण साळी यांनी विश्वजितराजे पाटील यांच्यावर विश्वास दाखवत त्यांची या महत्त्वाच्या पदावर नियुक्ती केली आहे.
तसेच या नियुक्तीसाठी शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी, महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. मा. गुलाबराव पाटील, रावेर लोकसभा संपर्क प्रमुख आमदार तुकाराम काते, आमदार किशोर पाटील, आमदार चंद्रकांत पाटील, आमदार अमोल पाटील, आमदार चंद्रकांत सोनवणे, माजी आमदार लताताई सोनवणे, धाराशिव जिल्हा संपर्क प्रमुख माजी खासदार उन्मेश पाटील, माजी आमदार शिरीष चौधरी, जिल्हाप्रमुख समाधान महाजन, मार्गदर्शक डॉ. मनोहर पाटील, जामनेर तालुकाप्रमुख ॲड. भरत पवार यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी समर्थन दिले.
युवासेना विभागीय सचिव अविष्कार भुसे, उत्तर महाराष्ट्र समन्वयक प्रथमेश पाटील, कार्यकारणी सदस्य किशोर भोसले, रावेर लोकसभा संपर्क प्रमुख शर्मिला येवले तसेच जळगाव लोकसभा संपर्क प्रमुख निखिल चौधरी यांच्या सूचनेनुसार ही नियुक्ती निश्चित करण्यात आली.
नियुक्तीनंतर विश्वजितराजे पाटील यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, “वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या विचारांचा व हिंदुत्वाचा प्रचार-प्रसार करण्याची संधी मिळाल्याबद्दल मी सर्व वरिष्ठ नेत्यांचा मनःपूर्वक आभारी आहे. माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही आणि संघटन मजबुतीसाठी पूर्ण ताकदीने काम करेन.”
या नियुक्तीमुळे रावेर लोकसभा क्षेत्रात युवासेना अधिक सक्षम होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


Post a Comment
0 Comments