Type Here to Get Search Results !

पाचोरा पोलिसांची मोठी कारवाई; दोन कोटींच्या अफू तस्करी प्रकरणातील फरार आरोपी जेरबंद


दिशा लाईव्ह न्यूज --::----पाचोरा पोलिसांनी दाखवलेल्या सतर्कता आणि चोख कारवाईमुळे राजस्थानमधील तब्बल दोन कोटी रुपयांच्या अफू तस्करी प्रकरणातील दोन वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला अटक करण्यात यश मिळाले आहे. या कारवाईमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेचे पुन्हा एकदा दर्शन घडले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित आरोपी हा राजस्थान राज्यातील मोठ्या अफू तस्करी प्रकरणात मागील दोन वर्षांपासून फरार होता. विविध ठिकाणी शोध घेऊनही तो पोलिसांच्या हाती लागत नव्हता. मात्र पाचोरा पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार आरोपी परिसरात येणार असल्याचे समजताच सापळा रचण्यात आला.

योग्य वेळी कारवाई करत पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेतले. चौकशीत त्याची ओळख पटताच तोच फरार आरोपी असल्याचे स्पष्ट झाले. या अटकेमुळे मोठ्या गुन्ह्याचा तपास आता अधिक वेगाने पुढे जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

या कारवाईबद्दल पाचोरा पोलिसांचे सर्व स्तरातून कौतुक होत असून, गुन्हेगारांना कोणत्याही परिस्थितीत सोडले जाणार नाही, असा स्पष्ट संदेशही या घटनेतून  गुन्हेगारांना देण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments