पहूर प्रतिनिधी- ता जामनेर
दिशा लाईव्ह न्यूज --::---- पहूर येथे आयशरची पंचर दुकानाला जोरदार धडक लागून आयशर गाडी झाडावर आढळल्याने जीवितहानी टळली असून एक जण जखमी झाला आहे.
काल दि.13 रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास छत्रपती संभाजी नगर कडून पहुरकडे येणाऱ्या आयशर क्रमांक एम एच 19 सी, एक्स 9520 ही आयशर गाडी छत्रपती संभाजी नगर कडून पहूर कडे येत असताना जळगाव छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय महामार्ग लगत असलेल्या व सपना बिल्डिंगला लागूनच असलेल्या पंचर दुकानावर जोरदार धडक देऊन आयशर गाडी थेट झाडावर आढळल्याने जीवित आणि टळली असली तरी पंचर दुकानाचे मालक अलीम भाई हे जखमी झाले आहे तर आयशर गाडीवरील चालक राजू पवन द्राक्षे हे मध्य धुंद अवस्थेत गाडी चालवत असल्याचे समजते.
अपघात इतका भयंकर होता की अपघात होताच आजूबाजूच्या परिसरातील लोक मदतीसाठी धावून आले. सुदैवाने जीवितहानी टाळली असून जीवित हानी टाळली असून अपघात मात्र भयानक होता गाडीचे समोरचे तोंड मात्र संपूर्ण चुरा झाल्याचे दिसून येत आहे.
गतिरोधकाची मागणी
दरम्यान जळगाव छत्रपती संभाजी नगर राष्ट्रीय महामार्गालगत अजिंठा पेट्रोल पंपाजवळ नियमित सतत अपघात होत असल्याने या ठिकाणी गतिरोधकाची मागणी नागरिकांनी केली आहे गतिरोधक लवकरात लवकर बसावे जेणेकरून भविष्यात मोठा अपघात होणार नाही अशी ग्रामस्थांची मागणी आहे.


Post a Comment
0 Comments