Type Here to Get Search Results !

खळबळ......शेंदुर्णी जीन प्रेस संचालकाला अपात्र करा – अतुल लहासे.पहूर.

 


 
दिशा लाईव्ह न्यूज-पहुर – -::--शेंदुर्णी जीन प्रेस सोसायटी मध्ये निवडून आलेल्या संचालकाला अपात्र करावे अशी मागणी पहुर येथील समाजसेवक अतुल लहासे यांनी जिल्हा उपनिबंधकांकडे केली आहे.

पहूर येथील सामाजिक  व माहिती अधिकार कार्यकर्ते अतुल लहासे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहेत की, शेंदुर्णी सहकारी खरेदी विक्री जिनिंग सोसायटी ता. जामनेर जि. जळगाव येथे नव्याने स्थापन झालेल्या संचालक मंडळा मध्ये पहुर येथील श्री. योगेश भागवत बनकर यांची संचालक म्हणून निवड झाली आहे. मात्र सदरील व्यक्तीने शपथपत्रात दोन अपत्य असल्याची माहिती सादर केली असून आज रोजी सदरील इसमास तीन अपत्य आहेत.





 तरी निवडणूक आयोगाच्या नियमावली प्रमाणे २००२ साला नंतर तीन अपत्य असलेल्या व्यक्तीस निवडणूक लढण्याचा कुठलाही अधिकार नाही. खरी माहिती लपवून सदरील ईसमाने शासनाची दिशाभूल केली आहे.

तरी आपणास विनंती आहे की, सदरील प्रकार हा गंभीर स्वरूपाचा असून आपण चौकशी करून संबंधित व्यक्तीला अपात्र घोषित करावे व त्या जागी नियमानुसार पोटनिवडणूक घ्यावी ही आपणास विनंती आहे. 
अशी मागणी निवेदनाद्वारे अतुल लहासे यांनी केली आहे. दिलेल्या निवेदणावर अतुल लहासे यांची स्वाक्षरी आहे.

Post a Comment

0 Comments